आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजनगरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- विवाहितेने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी बजाजनगरात उघडकीस आली. ज्योती प्रकाश वर्धे (३५, रा. देवगिरी हाउसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सोमवारी सकाळी पती प्रकाश वर्धे नेहमीप्रमाणे किराणा दुकानावर कामाला गेले. दोन्ही मुले शाळेत गेल्याने ज्योती घरी एकट्याच होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा शाळेतून घरी परतला असता त्याला घराचा दरवाजा आतून बंद दिसल्याने आईला हाक मारत दरवाजा ठोठावला. मात्र, आई आतून प्रतिसाद देत नसल्याने वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधून माहिती दिली. प्रकाश वर्धे यांनी खिडकी तोडून आत डोकावून पाहिले असता त्यांना पत्नी ज्योती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. बेशुद्धावस्थेतील ज्योती यांना घाटीमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ज्योती यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

बातम्या आणखी आहेत...