आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत उडी घेतलेल्या विवाहितेचा अखेर मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 परतवाडा- अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या शिंदी बुद्रूक येथील एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयतन केला. मात्र देव बलवत्तर असल्याने तिला ग्रामस्थांनी विहिरीतून जीवंत बाहेर काढले, परंतु दुर्दैवाने अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. रेश्मा राहुल मुळे(वय २५), रा. शिंदी बु. असे मृतक विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. ही घटना साेमवारी (दि. ३) सकाळी सातच्या सुमारास घडली. 


मृतक रेश्मा हिने गावातीलच रोडलगत असलेल्या विहिरीत सकाळी सातच्या सुमारास उडी घेत अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब मो. आरिफ शे. गुलाम व सैनिक अंकुश भगत यांनी जीवाची पर्वा न करता लगेच विहिरीत उडी घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने तिला जिवंत बाहेर काढले. उपचारासाठी लगेच अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...