आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली- सेनगाव तालुक्यातील जयपुर येथे एका महिलेने रविवारी (ता. 8) दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक महिला दिनीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर आत्महत्येचे नमके कारण समजू शकले नाही.
सेनगाव तालुक्यातील जयपुर येेथे अंकुश लांभाडे यांचे कुटुंब राहते. घरी पत्नी व दोन मुली असून आई, वडिल गावातच इतर ठिकाणी राहतात. अंकुश लांभाडे यांच्या नावे तीन एकर शेती असून या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या दोन्ही मुली आजी-आजोबा कडेच रहतात. आज सकाळी लांभाडे हे शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणी नाही हे पाहून त्यांची पत्नी उमा अंकुश लांभाडे (32) यांनी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास घराचे दरवाजे आतून बंद करून घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या वेळी त्यांच्या मुलींनी दरवाजा वाजला असता आतून आवाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला.
शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांनीही आवाज दिले, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी अंकुश लांभाडे यांना निरोप दिला ते देखील तातडीने घरी आले. त्यानंतर गावकऱ्यांनी दरवाज्या तोडून पाहिले असता उमा लांभाडे यांचा मृतदेह गळफास घेतलेेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी पोलिस पाटील अमरदास पारीसकर यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. सेनगावचे उपनिरीक्षक बाबुराव जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कऱ्हाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र उमा लांभाडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जागतीक महिला दिनी झालेल्या या घटनेमुळे सेनगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.