आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू; ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. खासगी रुग्णालयातून या महिलेला सरकारीमध्ये पाठवण्यात आले होते. कक्षात १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ८ महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे. ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात तिचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे तत्काळ निदान करून त्यांना टॅमी फ्लूचे औषध देण्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना सूचना केल्या आहेत. मात्र बहुतांशी डॉक्टरांकडून व्हायरल आजाराचे उपचार केले जात असल्याने स्वाइन फ्लू बळावत असल्याचे दिसून येत आहे. मृतांत सर्वाधिक रुग्ण हे खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवले जात असल्याने मृत्यूची संख्या वाढत असल्याचे कक्षाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...