आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात उष्माघाताचा हा पहिला बळी.. आठवडी बाजारात आलेल्या महिलेचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहामांडवा- आठवडी बाजारात आलेल्या एका वृद्ध महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा (ता. पैठण) येथे मंगळवारी उघडकीस आली. राज्यात उष्माघाताचा हा पहिला बळी आहे. टाकळी अंबड येथील बिजानबी नवाब शेख (वय-80) मंगळवारी विहामांडवा येथील आठवडी बाजारात आल्या होत्या. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्या मुलासोबत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या.

 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना औषधे दिली. मात्र, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर चालत जावून बिजानबी चक्कर येऊन पडल्या. संध्याकाळी नागरिकांना मृत अवस्थेत आढळल्या याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली.घटनास्थळी येऊन पोलीसांनी मयत बिजानबी शेख यांच्या कंबरेतील पैशाच्या पिशवीत बघितले असता त्यात गोळ्याचे पाकीटसह शंभर रुपयेची नोट व त्यांच्या मुलीचा चिठ्ठीत लिहिलेला मोबाइल नंबर सापडले. त्यावर संपर्क साधल्यानंतर बिजानबी शेख यांची ओळख पटली.

 

पोलिसांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता. वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मयत झाल्याचे घोषित केले.बुधवारी सकाळी त्यांच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर आलेल्या अहवालात उष्माघात व उपासमारीने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सांगण्यात आला सदरील घटनेची नोंद येथील पोलिस चौकीत घेतली असून पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विहामांडवा पोलिस चौकीचे स.पो.उप निरिक्षक प्रदिप एकशिंगे ,स.फौ.संजय मदने, पो.ना.माळी भगवान धांडे हे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...