आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलू येथे रेल्वेची धडक लागल्याने महिला जागीच ठार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू- येथील काळेपाणी परिसरात राहत  असलेल्या एका महिलेस रेल्वेची धडक लागल्याने  तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १४ जानेवारी रोजी पहाटे सहा- साडेसहाच्या दरम्यान घडली.  


शहरातील रेल्वेपटरीला लागून असलेल्या काळेपाणी या परिसरातील रहिवासी निर्मला विठ्ठल गायकवाड (४० ) ही महिला रेल्वे स्टेशनकडे जात असताना तिला समोरून येणाऱ्या नरसापूर -नगरसोल या एक्स्प्रेस गाडीचा अंदाज न आल्यामुळे धडक लागल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सेलू -सातोना दरम्यान सातोनाच्या दिशेला सेलू स्टेशनच्या जवळ घडली.या घटनेची माहिती मिळताच सेलू रेल्वे पोलिस चौकीचे हवालदार व्ही. एस.टेकाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. 


निर्मला गायकवाड यांच्यावर तहसील रोडवरील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला गायकवाड यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन मुले असा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...