आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालत्या रेल्वेतून उतरताना पडली महिला, कोच आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकली, प्लॅटफॉर्म फोडून जीवंत काढले पण नंतर मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन - चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे हे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अथ्यंत सावधगिरीने रेल्वेत चढायला किंवा उतरायला हवे. मध्य प्रदेशच्या उज्जैनजवळच्या नागदा रेल्वे स्टेशनवर एका महिलेला अशाच चुकीमुळे जीव गमवावा लागला.

 

चालत्या रेल्वेतून उतरताना ही महिला खाली पडली आणि रेल्वे तसेच प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. रेल्वे पुढे जात राहिली तर महिला रेल्वेबरोबर गोल घसरत राहिली आणि त्ला गंभीर दुखापत झाली. पोलिस आणि रेस्क्यू टीमने प्लॅटफॉर्म फोडून तिला जीवंत बाहेर काढले पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. महिलेला वाचवण्यासाठी ड्रील मशीनच्या मदतीने प्लॅटफॉर्म तोडण्यात आला. महिला इंदूर-जोधपूर ट्रेनमध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी आली होती. 

बातम्या आणखी आहेत...