Home | Maharashtra | Pune | Women doctor beaten by bjp corporator Aarati kondhare in Sassoon hospital Pune

पुण्यात भाजपच्या नगरसेविकेविरोधात गुन्हा दाखल, ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 13, 2019, 04:17 PM IST

डॉ. खंडागळे यांनी व्हिडिओ किंवा फोटो काढू नका, असे सांगितल्यावरही त्या त्यांचे फोटो काढू लागल्या

  • Women doctor beaten by bjp corporator Aarati kondhare in Sassoon hospital Pune

    पुणे- महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेकडून ससून सर्वोपचार रुग्णलयातील महिला डॉक्टरला शिवीगाळ मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी (13 मार्च) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला.

    बंडगार्डन पोलिस ठाण्यात संबंधित नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी एकाच वेळी अनेक पेशंट आले असता व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील तपासण्यासाठी पाठविण्यात येत असताना आरडाओरडा करुन महिला डॉक्टरला भाजप नगरसेविकेकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी डॉ. स्नेहल अशोक खंडागळे (वय-26) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

    याबाबत पोलिसांनी सांगितले की, ससून रुग्णालयात मंगळवारी रात्री आप्तकालीन वार्डात 6 डॉक्टर ड्युटीवर होते. डॉ.स्नेहल खंडागळे याही ड्युटीवर होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अपघातातील तीन जखमींना ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याचवेळी इतरही काही पेशंट होते. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरती कोंढरे त्याठिकाणी आल्या. त्यावेळी डॉ. खंडागळे या एका गंभीर रुग्णावर उपचार करत होत्या. त्यांनी मोठमोठ्यांनी आरडाओरडा करीत एका रुग्णाविषयी विचारणा करुन येथे कोण डॉक्टर आहे. या पेशंटला कोण पहात आहे, असे विचारु लागल्या. हा पेशंट गंभीर आहे. त्याच्यावर लवकर उपचार करा,' असे म्हणू लागल्या. तेव्हा डॉ. खंडागळे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले आहेत. डोक्याला टाके टाकले आहेत. त्यांना सिटी स्कॅन करण्यासाठी पाठवायचे आहे. परंतु, त्या पुन्हा पुन्हा केव्हा घेऊन जाणार आहे, लवकर घेऊन जावा, असे मोठ्याने ओरडून बोलत होत्या. त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी तुझे नाव काय तुझी तक्रार डॉ. तांबे सरांकडे करते. खंडागळे यांनी नाव सांगून गंभीर रुग्णावर उपचार करीत असताना कोंढरे या मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करु लागल्या. त्यावेळी डॉ. खंडागळे यांनी व्हिडिओ किंवा फोटो काढू नका, असे सांगितल्यावरही त्या त्यांचे फोटो काढू लागल्या. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या मोबाईलला हात आडवा लावला. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्याबरोबर असलेले सचिन कोंढरे हे नगरसेविकेला घेऊन जाऊ लागले. तेव्हा त्यांनी पुन्हा डॉक्टरला अर्वाच्य शिवीगाळ केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी केवळ सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एम.पाटील करत आहे.

Trending