Home | National | Other State | women doctor cheated reped by fraud In begaluru

40 वर्षीय महिला डॉक्टर घेत होती नवरदेवाचा शोध, लोकल दैनिकात दिली एक जाहिरात, मग काही दिवसांनी जो फोन आला त्यामुळे बदलले पूर्ण आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 05, 2018, 04:01 PM IST

लग्नाच्या एका जाहिरातीमुळे बरबाद झाली महिला डॉक्टरची लाइफ, अनेकदा झाला रेप, लुटले 26 लाख

 • women doctor cheated reped by fraud In begaluru

  बंगळुरू - कर्नाटकात एका 40 वर्षीय महिला डॉक्टरला लग्नाची जाहिरात देणे महागात पडले. जाहिरातीमुळे ती भामट्याच्या जाळ्यात अशी अडकली, आयुष्य पुरते बरबाद झाले. दैनिकातील जाहिरात पाहून एक तरुण लग्नासाठी पुढे आला. दोघांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आणि यादरम्यान त्या व्यक्तीने स्वत:ला मोठा अधिकारी असल्याचे भासवून तिच्या नातेवाइकांनाही नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवले. याच बहाण्याने त्याने डॉक्टर आणि तिच्या नातेवाइकांकडून तब्बल 26 लाख रुपये उकळले. परंतु कुणालाच नोकरी नाही लागली. या भेटीगाठींदरम्यान त्याने अनेकदा महिलेशी संबंधही बनवले, परंतु लग्नाला फक्त 2 दिवस उरले असताना आपला फोन स्विच ऑफ केला. तेव्हापासून त्या भामट्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी या ठगाचा शोध घेणे सुरू केले आहे.

  जाहिरातीमुळे अडकली भामट्याच्या जाळ्यात...
  - बंगळुरूच्या डॉक्टरने एका लोकल दैनिकात लग्नासाठी अॅड छापली होती. अॅड आल्याच्या काही दिवसांनी राममूर्ती नावाच्या एका व्यक्तीने त्यांना कॉल केला. म्हणाला की, तिच्याशी लग्न करू इच्छितो.
  - यानंतर दोघांमध्ये फोनवर अनेक वेळा बातचीत झाली आणि मेसेजिंगही सुरू झाली. मग दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबरला ते कोरामंगलाच्या एका मॉलमध्ये भेटले.
  - राममूर्तीने या भेटीत स्वत:ला हेल्थ डिपार्टमेंटमध्ये मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगितले आणि म्हणाला की, तो रिक्रूटमेंट कमिटीचाही मेंबर आहे. तो महिलेला असेही म्हणाला की, जर तुझ्या नातेवाइकाला नोकरीची गरज असेल, तर मी लावून देऊ शकतो.

  26 लाखांचा गंडा...
  - महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तिने आपल्या काही मित्रांना आणि नातेवाइकांना राममूर्तीची भेट घातली. त्यांच्यात नोकरीवरून चर्चा झाली.
  - महिला म्हणाली की, सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून राममूर्तीने तिच्या मित्रांकडून तसेच नातेवाइकांकडून 22 लाख रुपये उकळले. याशिवाय त्याने महिलेकडूनही 4 लाख रुपये घेतले.
  - महिलेच्या नातेवाइकांना कोणतीही नोकरी लागली नाही, शिवाय राममूर्तीने पैसेही परत केले नाहीत. तरीही महिलेचा त्याच्यावरील विश्वास कमी झाला नाही.

  22 नोव्हेंबरला ठरले होते लग्न...
  - यानंतर आरोपीने महिलेला लग्नासाठी आवश्यक म्हणून तिचे आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंटस घेतले. यादरम्यान हॉटेल्समधील भेटींदरम्यान दोघांमध्ये अनेक वेळा संबंधही बनले.
  - राममूर्तीने महिलेला सांगितले की, 22 नोव्हेंबरला शेषाद्रिपुरम सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दोघेही लग्न करूत. त्यापूर्वी 20 नोव्हेंबरलाही तो महिलेला हॉटेलमध्ये अखेरचा भेटला होता.
  - महिलेने सांगितले की, त्या रात्रीनंतर तिने राममूर्तीला कधीही पाहिले नाही. त्याच्याशी बोलणेही झाले नाही. त्या रात्रीनंतर त्याचा फोन कायम स्विच ऑफ येत आहे.
  - यानंतर महिलेने 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार केली ज्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक केली जाईल.

Trending