आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीनियर जातीवरून करत होते रॅगिंग आणि टॉर्चर, या जाचाला कंटाळून महिला डॉक्टरने केली आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील नायर हॉस्पीटलची मेडिकल विद्यार्थिनी पायल तडवीने वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या वरिष्ठांकडून होणाऱ्या जातीवाचक टीकेने ती त्रस्त झाली होती. पायलने याबाबत रुग्णालय प्रशासनाला सांगून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

 

कुटुंबीय मागतायेत न्याय

पायल तडवीला मे 2018 मध्ये मुंबईच्या नायर रुग्णालयात प्रवेश भेटला होता. तिची तेथेच निवासी डॉक्टर म्हणून नियुक्ती देण्यात आली. तिला आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळाल्यामुळे तिचे तीन वरिष्ठ सहयोगी यावरून तिला चिडवत होते आणि दरवेळी या गोष्टीचा उल्लेख करत होते. अनेक महिन्यांपर्यंत हे चक्र असेच सुरू होते. विद्यार्थिनीने याबाबत हॉस्टेल अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली होती. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. 22 मे रोजी कथितरित्या या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. कुटुंबीय आता न्याय मागत आहेत. 

 

22 मे पासून फरार आहेत आरोपी

या प्रकरणातील तीन आरोपी 22 मे पासून फरार आहेत. पीडितेच्या साथीदारांच्या मते, वरिष्ठ पायलने प्रवेश घेतल्यापासूनच रॅगिंग आणि टॉर्चर करत होते. तिने तक्रार दिल्यानंतरही काहीच कारवाई न झाल्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी याविरोधात रुग्णालयात प्रदर्शन देखील केले. 

 

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कलम 306 आणि एससी एससी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...