आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका बॅक्टेरियामुळे 8 वर्षे अंथरुणाला खिळून राहिली ही महिला, यामुळे वजन वाढून गेले 200 किलोच्या वर 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साउथम्पटन - इंग्लंडच्या साऊथम्पटनमद्ये राहणाऱ्या एका महिलेची एका बॅक्टेरियामुळे अशी अवस्था झाली की तिला 8 वर्षे अंथरुणाला खिळून राहावे लागले. तिला खाणे, पिणे, अंघोळ अगदी सर्वकाही अंथरुणावरच करावे लागत होते. पाहता पाहता तिचे वजन 200 किलोपेक्षा जास्त झाले. या महिलेने तिची आपबिती नुकतीच एका न्यूज चॅनलने दाखवलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवली आणि तिला मदत देऊ केली. यात अनेक आश्चर्यकारक अशा गोष्टी समोर आल्या. 


49 वर्षांच्या क्लॅरी 8 वर्षांपूर्वीपर्यंत अगदी आनंदाने जगत होत्या. पण त्यांच्या शरीरात एका धोकादायक बॅक्टेरीया गेला. हा बॅक्टेरिया त्यांचे शरीर आतून खाऊ लागला, त्यामुळे या महिलेचे जागेवरून हलणेही बंद झाले. तिला necrotizing fasciitis नावाचा जीवघेणा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर महिला 8 वर्षे अंथरुणाला खिळून होती. तिचे वजन 200 किलोपेक्षा जास्त झाले. महिलेने चॅनलशी बोलताना सांगितले की, इंग्लंडच्या सर्वात सुंदर लोकेशनला राहत असूनही तिला कधी घराबाहेर सूर्यप्रकाशही पाहता आला नाही. 


पुढे वाचा, डॉक्टर म्हणाले यांचे शरीर बनले आहे टाइम बॉम्ब.. 
 

बातम्या आणखी आहेत...