आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेस छळाची तक्रार कुठेही दाखल करता येणार, आतापर्यंत सासरच्या गावातच होत असे गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - छळ करून सासुरवाडीतून घराबाहेर काढलेली विवाहित महिला आता माहेरच्या गावात किंवा ज्या ठिकाणी तिला शक्य असेल तेथे याबाबतची तक्रार दाखल करू शकेल. आतापर्यंत कलम ४९८ अन्वये अशा महिला केवळ सासुरवाडीच्या गावातच तक्रार दाखल करू शकत होत्या. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने विविध राज्यांतून दाखल झालेल्या अशा याचिकांवर सुनावणी करताना हा निकाल दिला.


उत्तर प्रदेशातील रुपाली देवी यांची सात वर्षांपूर्वी दाखल एक याचिका यात होती. यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, अशा प्रकरणांत फक्त सासर असलेल्या गावातच तक्रार दाखल करण्याची गरज नाही. कुठेही तक्रार दाखल होऊ शकेल.


कलम ४९८ ए मधील तरतुदींवर विचार : हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या प्रकरणात कलम ४९८ ए मध्ये हा क्रूर गुन्हा मानला गेलेला नाही. या सुप्रीम कोर्ट विचार करत होते. या तरतुदीमुळे अशा प्रकरणांचा तपास बाहेर जिल्ह्यातील पोलिसांकडे देता येत नाही.