आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याच्या सकाळी आवरण्याने होते झोपमोड, पुण्यात कोंबड्याविरुद्ध महिलेने दाखल केली तक्रार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दरराेज पहाटेच्या सुमारास काेंबडा जाेरजाेरात आरवत असल्यामुळे झाेपमाेड हाेत असल्याचा आरोप करत एका महिलेने थेट काेंबड्याविराेधात पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या काेंबड्यासह त्याच्या मालकावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलेने केली आहे. याबाबत समर्थ पाेलिस ठाण्यात महिलेने तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, पाेलिसांनी तक्रारदार महिलेचे नाव न सांगता काेंबड्याविराेधात तक्रार आल्याचे मान्य केले आहे. काेंबडा दरराेज पहाटे आरवत असल्याने माझ्यासह कुटुंबातील व्यक्तींची झाेपमाेड हाेते. काेंबड्याच्या मालकाला यासंदर्भात अनेकदा सूचना केली. मात्र, त्यांच्याकडून काहीच दाद मिळाली नाही. त्यामुळे आपण पोलिसांत धाव घेतल्याचे महिलेने म्हटले आहे. महिलेची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. मात्र, चक्क कोंबड्याविरुद्धच तक्रार आल्याने कारवाई कशी करावी, याबाबत पोलिस मात्र चांगलेच संभ्रमात आहेत.