आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Women Fought For The First Time In France 231 Years Ago, Since Then, They Have Won Every Right To Education, Marriage, Voting, Society Has Simply Not Given Anything.

२३१ वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये महिलांचा पहिल्यांदा लढा...तेव्हापासून शिक्षण, लग्न, मतदान प्रत्येक हक्क लढून मिळवला, समाजाने सहजपणे काहीच दिले नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पहिल्या महिला क्रांतीला समर्पित, फ्रान्सने अमेरिकेला भेट दिली होती - Divya Marathi
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पहिल्या महिला क्रांतीला समर्पित, फ्रान्सने अमेरिकेला भेट दिली होती
  • स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पहिल्या महिला क्रांतीला समर्पित, फ्रान्सने अमेरिकेला भेट दिली होती
  • १८४८ ला न्यूयॉर्कमध्ये मतदानाच्या अधिकारासाठी आंदोलन, ७२ वर्षांनी मिळाला

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पहिल्या महिला क्रांतीला समर्पित, फ्रान्सने अमेरिकेला भेट दिली होती


१७८९ च्या फ्रान्स क्रांतीत महिलांनी समानतेसाठी पहिला लढा दिला. महिलांनी ६० गट स्थापित केले. त्यात द सोसायटी ऑफ रिव्हॉल्यूशनरी अँड रिपब्लिकन वुमन क्लबची मोठी चर्चा झाली. महिलांनी शिक्षण, पती निवडण्याच्या, मतदान आणि निवडणूक लढवण्याची हक्कांची मागणी केली होती. नवीन सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या व लग्नाला नागरी कायद्याअंतर्गत मान्यता दिली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी याच महिला क्रांतीला समर्पित आहे. १८८६ मध्ये फ्रान्सने अमेरिकेला ही भेट म्हणून दिली होती. 
 १८४८ ला न्यूयॉर्कमध्ये मतदानाच्या अधिकारासाठी आंदोलन, ७२ वर्षांनी मिळाला


१८४८ ला न्यूयॉर्कमध्ये महिलांनी मतदानाच्या हक्कासाठी आंदोलनाला सुरुवात केली. १९०८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये १५ हजार महिलांनी यासाठी मोर्चा काढला होता. १९०९ ला पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला. १९२० मध्ये अमेरिकेने महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केला. १९७५ ला संयुक्त राष्ट्र परिषदेने महिला दिनाला मान्यता दिली. तर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ८ मार्च हा दिवस महिला अधिकारांसाठी समर्पित असेल असे निश्चित केले. जगातील १५ देशांमध्ये ८ मार्चला सुटी असते.कधीही हिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले नाही, अण्वस्त्र हल्ल्याविरोधात पहिला संप पुकारला
 
महिलांनी कधीही हिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले नाही. अणुबॉम्ब हल्ल्याच्या विरोधात पहिला आ‌वाज महिलांनीच उठवला. १९६१ मध्ये आण्विक चाचणीविरोधात अमेरिकेच्या ६० शहरांमध्ये ५० हजार महिलांनी संप पुकारला होता. याशिवाय सामाजिक मुद्द्यांवरही महिला नेहमी संवेदनशील राहिल्या आहेत. जगासमोर आज हवामान बदलाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग आणि रीटा हार्ट दोन्हीही महिलाच आहेत.