Home | National | Gujarat | women gang posing as breatfeeding a child looted clothing shop, captured in cctv

पडदा लावून बाळाला दूध पाजत होती महिला, मागे सुरू होता वेगळाच कार्यक्रम; पाहा Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 07, 2018, 02:44 PM IST

त्यांच्या चोरी करण्याची पद्धत अशी होती, की कुणालाही संशय आला नाही. तरीही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • सुरत - गुजरातच्या कतारगाम परिसरात 6 महिलांनी मिळून एका गार्मेंट शॉपवर दरोडा टाकला. या महिलांनी दुकानातून 70 हजार रुपयांचा माल पळवला. त्यांच्या चोरी करण्याची पद्धत अशी होती, की कुणालाही संशय आला नाही. त्यांनी हा दरोडा अतिशय योजनाबद्धरित्या टाकला. प्लॅनिंगनुसार, त्या महिलांपैकी एकीने चक्क बाळाला दूध पाजण्याचे सोंग धरले होते. उर्वरीत महिलांनी साडीचा पडदा बनवला. प्रत्यक्षात त्या दूध पाजण्याचे नाटक आणि पडदा लावण्याचे सोंग करून आपले कारस्थान लपवत होत्या. ज्यावेळी एक महिला समोर बाळाला दूध पाजत होती. त्याचवेळी उर्वरीत महिला दुकानाच्या शटरचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होत्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Trending