आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक...4 रिक्षाचालक आणि त्यांच्या साथीदाराने महिला प्रवाशावर केला सामुहिक बलात्कार, महिलेला अज्ञात ठिकाणी टाकून झाले फरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गुरुग्राम (हरियाणा) : येथे ऑ़टोमध्ये जात असलेल्या एका महिलेसोबत क्रुरता केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 4 ऑटो ड्रायव्हर आणि त्यांच्या एका साथीदारने सामुहिक बलात्कार केल्याचा महिलेने आरोप केला आहे. महिला नखडौला चौक ते आयएमटी येथील कंपनीत जाण्यासाठी निघाली होती. पण ऑटो चालकाने महिलेला एका अज्ञात स्थळी नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. याबाबत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

 

महिला नजफगड भागातील रहिवासी असून 2013 तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिचे पती आयएमटीमध्ये एका खासगी कंपनीत ठेकेदार पदावर काम करत होते. त्यांच्या निधनानंतर कंपनीकडे त्यांचे भरपूर पैसे बाकी होते. याच पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी शनिवार 29 डिसेंबर रोजी दोन वाजेच्या सुमारास दिल्ली ते नखडौला बसमधून उतरली होती. तेवढ्यात तेथील एका रिक्षावाल्याने आयएमटी ते मानेसरपर्यंत येण्यास विचारले. तेव्हा रिक्षामध्ये चालकाव्यतिरिक्त अन्य युवक होता आणि दोघेही समोर बसले होते. नंतर त्यांनी महिलेला भांगरौला येथील एका खोलीत नेले आणि तेथे सामुहिक बलात्कार केला. काहीवेळात तेथे त्यांचा तिसरा साथीदार आला. त्यानेही महिलेच्या अब्रुचे लचके तोडले. दोघांनी संध्याकाळी दोघांनी महिलेला ऑ़टोमध्ये बसवून रामपुरा येथे गेले. तेथेही आणखी दोन रिक्षावाल्यांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत अज्ञात ठिकाणी टाकून फरार झाले. महिलेने शुद्धीवर आल्यानंतर रविवारी मानेसर पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकराविषयी तक्रार दाखल केली. 

 

तीन आरोपींना ठोकल्या बेड्या, बाकीचे अद्यापही फरार 
मानेसर महिला ठाणे एसएचओ निरीक्षक कांता यांनी सांगितले की, महिलेचा सामुहिक बलात्कार करणारे अंकित, दीपक आणि महिपाल या तिघांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून इतर फरार आरोपींचा कसून शोध घेत आहे.