आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायमुनानगर - 5-6 युवकांनी एका बाइकस्वाराला रोखले. बाइकवरील व्यक्तीसोबत एक तरुणी होती. यानंतर युवकांनी बाइकस्वाराला बांधून ठेवले आणि तरुणीला उसाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, नंतर धमकी देऊन पसार झाले. दुसरीकडे, बाइकस्वाराने जेव्हा पोलिसांत तक्रार दिली, तेव्हा कोणीही दखल दिली नाही.
ही घटना शनिवारी संध्याकाळची आहे. आत्मापुरी कॉलनीतील रहिवासी झाकिर हसन म्हणाले, ते बाइकवरून येत होते. यमुनाच्या रूळावर एका तरुणीने त्यांना लिफ्ट मागितली. त्यांनी लिफ्ट दिल्यावर तिने सांगितले की, यमुनानगरमध्ये स्टेशनजवळच ती राहते. ते जेव्हा हमीदा हँडजवळ पोहोचले तेव्हा तेथे 5-6 तरुणांनी त्यांची वाट अडवली.
त्यांनी मारहाण करून बाइकस्वारा झाकीर यांना दोरखंडाने बांधून ठेवले. मग त्यांच्या डोळ्यासमोर तरुणीला जवळच्याच उसाच्या शेतात घेऊन गेले. झाकीर यांनी विरोध केल्यावर तरुणीला यमुना कालव्यात फेकून देण्याची धमकी देण्यात आली. आरोपींनी त्यांच्या बाइकची किल्ली आणि मोबाइलही हिसकावून घेतला. त्या युवकांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तेथून पळ काढला.
झाकीर म्हणाले की, नंतर त्यांनी त्या तरुणीचा शेतात शोध घेतला आणि तिला आपल्यासोबत घरी नेले. ती खूप भ्यायलेली होती, यामुळे त्यांनी रात्री आपल्या घरीच तिला आसरा दिला. रविवारी झाकीर हसन आपल्या पत्नीसोबत पीडितेला घेऊन हमीदा पोलिसांत गेले आणि घटनेची तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी काहीच दखल न घेतल्याचा आरोप होतो आहे.
महिला पोलिस शीलावंती म्हणाल्या की, या घटनेची अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. बहुधा शहर पोलिसांत एखादी तक्रार आली असेल. दुसरीकडे शहर पोलिस स्टेशनचे इंचार्ज नरेंद्र सिंह म्हणतात की, अद्याप कोणतीही तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही. पोलिसांच्या या टोलवाटोलवीत पीडितेची मात्र फरपट होत असल्याने सर्वस्तरांतून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.