आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला जन्मापासूनच नव्हते गर्भाशय, त्यामुळे आई बनू शकत नव्हती, पण डॉक्टरांनी शोधला अनोखा उपाय, आता अनेकांसाठी ठरणार वरदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - वैद्यकीय इतिहासात प्रथमच एका मृत महिलेच्या गर्भाशयाचे प्रत्यारोपण (युटरस ट्रान्सप्लांट) केल्यानंतर एका मातेने निरोगी मुलीस जन्म दिला. ब्राझीलमध्ये ही शस्त्रक्रिया दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु या प्रकरणाचा गौप्यस्फोट बुधवारी करण्यात आला. या तंत्राचा वापर करून आता अनेक महिलांना मातृत्व सुख मिळवता येणार आहे. 


> साओ पावलो विद्यापीठातील डॉक्टर दानी अॅजेनबर्ग मुताबिक ३२ वर्षांच्या ज्या महिलेत गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. ती एका दुर्धर आजाराने ग्रस्त होती. तिला जन्मापासूनच गर्भाशय नव्हते.

> गर्भाशय देणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा स्ट्रोकने मृत्यू झाला होता. १० तासांच्या आत त्या मृत महिलेचे गर्भाशय काढून दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात आले.

> शरीर नवे अवयव अस्वीकार करू नये म्हणून अँटी मायक्रोबियल्स, अँटी ब्लड क्लाॅटिंग ट्रीटमेंटसह ५ विविध औषधी देण्यात आली.

> ५ महिन्यांनंतर गर्भाशयास शरीराकडून स्वीकार न करण्यासंबंधीचे संकेत मिळाले नाहीत. तसेच महिलेची मासिक पाळीही नियमित होती.

> प्रत्यारोपणाच्या ७ महिन्यांनंतर महिलेत IVFद्वारे बीजारोपण करण्यात आले. दहा दिवसांनंतर डॉक्टरांनी तिला गर्भधारणा झाल्याची माहिती दिली.

> ३२ आठवड्यांपर्यंत तिचा गर्भ चांगला होता. ३६ व्या आठवड्यात महिलेने २.५ किलो वजनाच्या मुलीस जन्म दिला.

> २०१३ मध्ये स्वीडनमध्ये प्रथमच जिवंत महिलेचा गर्भाशय प्रत्यारोपित केला होता. त्यानंतर आजवर अमेरिकेसह अनेक देशांत १० वेळा असे प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी ठरले. 


डॉ. एजेनबर्ग म्हणाले, निधन झाल्यानंतर अनेक व्यक्ती आपले अवयव दान करू इच्छितात. जिवंत महिलेचे गर्भाशय मिळणे खूप अवघड असते. त्यामुळे डॉक्टरांना मृत महिलेचे गर्भाशय हवे होते. शास्त्रज्ञांच्या मते, इन्फर्टिलिटी १० ते १५ % जोडप्यांवर यशस्वी ठरते. ५०० पैकी एका महिलेस गर्भाशयाची संरचना, गर्भाशयोच्छेदन (हिस्टेरेक्टॉमी) व संक्रमण होते. त्यामुळे गर्भधारणा करण्यास तिला त्रास होतो. नव्या पर्यायामुळे इन्फर्टिलिटीची समस्या असलेल्या जोडप्यांसाठी चांगला मार्ग सापडला आहे. हे संशोधन आम्हाला भविष्यात खूप मदत करेल, असे डॉ. एजेनबर्ग यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...