आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; ठार मारण्याचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे  - शहरातील मुस्लिमनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ करण्यात आला. तसेच तिचा विनयभंग करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पीडित विवाहितेचे माहेरचे कुटुंबीय मदतीसाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. त्यावरून आठ जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. 


या प्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यात आला. त्यासाठी अलीम खा काझी, रईसा अलीम काझी, रहिम अली काझी, नीलोफर रहिम काझी, सादिक खा अलीम खा काझी, सईद खा अलीम खा काझी, गुलशन मोहसीन शेख, रऊफ अलीम खा काझी यांनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच लग्नातील दागिने काढून घेतले. सादिक खा याने पीडितेच्या मानेच्या दिशेने सुरा मारून फेकला. तो चुकवल्यामुळे रईसा अलीम काझी यांनी पीडितेचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर अलीम काझी व रहिम काझी यांनी विनयभंग केला, अशी तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...