आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदींचे नाव नव्हे शाहीन बागचा महिला संघर्ष इतिहास नोंदवला जाईल' : मेवानी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अदानी आणि अंबानी यांना देश विकून बसले आहेत आणि दिल्ली मधील शाहीन बागच्या महिला ५०० रुपयांत विकले गेल्याचे सांगतात. मोदी चारित्र्यहनन नेते बनले आहेत. आठवीच्या इतिहास पुस्तकात मोदी यांचा इतिहास नाही येणार तर शाहीन बागमधील महिला संघर्षाचा येईल, सरकारशी असहकार करा आणि एनआरसी बाबत कोणती कागदपत्रे मागण्यास आले तर देऊ नका. अशा शब्दांत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

एनआरसी, सीएए आणि एनपीआर याचे विराेधात गुरुवारी पुण्यातील सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात महासभेचे आयाेजन करण्यात आले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी.काेळसे पाटील होते. या वेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तिस्ता सेटलवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सुषमा अंधारे, मोहन जोशी उपस्थित होते. या वेळी नागरिकांची उपस्थित होते.

आपण अनेक वर्षे दलित आणि सवर्ण, गरीब आणि श्रीमंत लढाई करत बसलो म्हणून मोदी -शाह सत्तेवर आले आहेत. जात पात धर्म सोडून भारतीय बनले पाहिजे. वीर सावरकर कोणी नव्हते तर ब्रिटिशांना माफीनामे देणारे सावरकर होते आणि आज त्यांची औलाद हिंदू आणि मुस्लिम भेद निर्माण करतात. संविधान, इन्कलाब जिंदाबाद बोला आणि आपले धर्म रीतिरिवाज घरात ठेवा, असा सल्ला मेवानी यांनी या वेळी बोलताना दिला.

तरुण उतरतात तेव्हा इतिहास बदलत असतो

एनआरसी विरोधात लढाई केवळ मुस्लिम समाजाची नाही. ज्यावेळी महिला आणि तरुण रस्त्यावर उतरतात त्यावेळी इतिहास बदलत असतो. हिंसा न करता आपण आंदोलन पुढे घेऊन जाऊ. आसाममध्ये हा कायदा प्रथम राबवला त्याला नजर अंदाज करता येत नाही. आसाममध्ये १४ लाख लोक निर्वासित छावणीमध्ये बंदी आहे, त्यांच्यासह इतरांना कॅम्पमधून सरकारने सोडून द्यावे. अनेक वर्षांच्या प्रयत्नामुळे ईशान्य भारत शांत झाला होता, परंतु मोदी आणि शाह जोडीने त्याला अशांत केले. नागरिकत्व केवळ बहाणा आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी केली.

'एल्गार' प्रकरणी सुडाचे राजकारण नाही : आव्हाड

पोलिस आपले शत्रू नसून ते राज्य सरकारच्या आदेशानुसार चालत असतात म्हणून तर कोरेगाव भीमा घडले. केंद्र सरकार एल्गार प्रकरणाचा तपास एएनआयकडे देण्यास प्रथम नकार देत होते, परंतु नंतर तातडीने तपास हाती घेतला. आम्हाला सुडाचे राजकारण करायचे नाही पण मागील सरकारचा चुकीचा तपास उघड करणार आहे, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
 

बातम्या आणखी आहेत...