आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women Implanted 2 Microchips In Her Body, It Is Useful To Open The Door And Send The Message

महिलेने शरीरामध्ये लावून घेतल्या 2 चिप, ही दरवाजा उघडण्यासाठी आणि संदेश पाठवण्याच्या कमी येते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्हरपूल (अमेरिका) : 31 वर्षांची एक महिला इंजीनिअर विंटर म्राज हिला अमेरिकेमध्ये सध्या 'बायोनिक वुमन' म्हणाले जात आहे. तिने एका टीव्ही प्रोग्राममध्ये खुलासा केला की, तिच्या हातामध्ये इम्प्लांट केलेल्या दोन चिपपैकी एक दरवाजा उघडण्याच्या कमी येते. दुसऱ्या चिपचा ती बिजनेस कार्डसाठी वापर करते. याव्यतिरिक्त हातांच्या बोटांमध्ये तिने मॅग्नेट आणि एका हातामध्ये दोन फ्लॅश लाइट इम्प्लांट करून घटले आहेत. जेणेकरून तिची रोजची कामे सोपी होऊ शकतील. 


स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या म्राजने सांगितले, सामान्य महिलेपासून बायोनिक वूमन बनण्याची सुरुवात एका कार अपघातानंतर झाली होती. तिने सांगितले की, यामध्ये तिची मान, गुडघे आणि टाचेला गंभीर जखमा झाल्या होत्या. यादरम्यान माझ्या खूप सर्जरी झाल्या. माझ्या एका गुडघ्याची कॅप 3डी प्रिंटेड आहे. कित्येक वर्षांच्या सर्जरीनंतर मी विचार केला की, मी माझे आयुष्य सोपे करण्यासाठी काही गोष्टी इम्प्लांट कराव्या का' 

दोन्ही चिप लावल्यामुळे आयुष्य सोपे झाले... 


म्राजने सांगितले की, माझ्या उजव्या हातात एक मायक्रोचिप लावलेली आहे, जी घराचे फ्रंट डोअर उघडण्याच्या कमी येते. याव्यतिरिक्त वर्क प्लेसमध्ये सिक्युरिटी कार्ड म्हणूनदेखील काम करते. तिने सांगितले की, एका शेजाऱ्याने तिला चिप बसवून घेण्याचा सल्ला दिला होता. दुसरी चिप डाव्या हातात लावलेली आहे. यामध्ये तिच्या बिजनेस कार्डचे कम्प्यूराइज्ड व्हर्जन स्टोअर आहे, जे ती लोकांच्या फोनवर पाठवू शकते. तिने सांगितले की, फिंगरटिप्समध्येही मॅग्नेट इम्प्लांट केले आहेत. यामुळे तिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची जाणीव होते आणि जी तिला वायर स्पर्श करण्यापासून दूर ठेवते. तिने सांगितले की, 'यामुळे माझे आयुष्य खूप सोपे झाले आहे.' 

बातम्या आणखी आहेत...