आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये महिलांनी घडवले नारीशक्तीचे दर्शन, हवेत फुगे सोडून घेतला नाइट वाॅकमध्ये सहभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशकात निघालेल्या नाइट वॉकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. - Divya Marathi
नाशकात निघालेल्या नाइट वॉकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

नाशिक : अंधारावर मात करतील, रातरागिणी, रातरागिणी, सावित्रीच्या लेकी आम्ही, अंधाराला डरणार नाही, ढोंगाचे पोल खोलू, माैन सोडू, चला बोलू..अशा विविध घोषणा देत दिव्य मराठी'च्या रातरागिणी उपक्रमात हजारो महिलांनी सहभागी होत सुरक्षेचा जागर केला. असुरक्षिततेचे बंधने झुगारून भितीचे सावट असलेल्या अंधारावर चालून जात नारीशक्तीचे दर्शन घडविले.

गर्भापासून घरापर्यंत आणि कार्यालयापासून रस्त्यांपर्यंत महिला असुरक्षित असताना तितकीच बंधनेही तिच्यावर घातली जातात. हीच बंधने झुगारून टाकण्यासाठी 'दिव्य मराठी'ने 'मौन सोडू, चला बोलू' या उपक्रमातंर्गत रविवारी रातरागिणी नाइट वाॅकचे आयोजन केले होते. गंगापूर रोड येथील मॅरेथाॅन चाैकातून रात्री ९ वाजता या नाइट वाॅकला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. पोलिस अायुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी उपक्रमाचे काैतुक केले. महिला लोकप्रतिनिधींनी हवेत फुगे सोडून नाइट वाॅकमध्ये सहभाग घेतला.

महिलांना निर्भय करूया, सुरक्षित शहर बनवू : विश्वास नांगरे पाटील

उषःकाल होता होता काळरात्र झाली! अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...सर्वात मोठ्या रात्री महिला सुरक्षेचा जागर करण्याचा दिव्य मराठीचा हा उपक्रम महिलांना ताकद देणारा ठरेल. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत. अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा हैद्रराबादला घटना घडली. महिलांना निर्भय करण्यासाठी निर्भया पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोलिसांतर्फे रात्री १२ पासून काही संस्थांना सोबत घेऊन सुरक्षित शहर ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.