Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Women in the flesh trade should come to the main stream of society

देह व्यापारातील महिलांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे

प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 09:46 AM IST

जागतिक एड्स साप्ताहनिमित्त मध्ये शेवगाव शिवनगर येथे तालुकास्तरीय वीर रणरागिणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 • Women in the flesh trade should come to the main stream of society

  नगर - देह व्यापारातील महिलांना आपली सामाजिक स्थिती उंचावणे महत्त्वाचे आहे. समाजाची निरागसता दूर करण्यासाठी संघटित होऊन आपले प्रश्न मांडले पाहिजे. देह व्यापारातील बळी महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन शेवगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष वझीर पठाण यांनी केले.

  जागतिक एड्स साप्ताहनिमित्त मध्ये शेवगाव शिवनगर येथे तालुकास्तरीय वीर रणरागिणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर चिंतामणी, अॅड. मीनानाथ देहाडराय, प्रवीण मुत्याल, डॉ. मनीषा लढ्ढा, अस्लम शेख (समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय आदी उपस्थित होते. वजीर पठाण म्हणाले, देह व्यापारातील बळी महिलांना विविध शासकीय व्यवसायाविषयी योजनाची मदत मिळून देण्यास नगर परिषद शेवगाव स्नेहालय सोबत काम करेल. समाजातील शोषित वंचित व उपेक्षित प्रत्येक घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. चिंतामणी सर यांनी शासकीय कागदपत्रे काढण्यास येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले.

  देहडराय यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याची माहिती दिली. डॉ. मनीषा लड्डा यांनी आरोग्यविषयक आजारांबद्दल माहिती देऊन विविध उपचारांबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात दीपक बुरम यांनी स्नेहालय आणि स्नेहज्योत प्रकल्पाबाबत माहिती देऊन देहविक्रय करणाऱ्या महिलांनी समाजासाठी उपक्रम राबवले जातात, याबद्दल सांगितले. देहविक्रय करणाऱ्या महिलांनी विविध शासकीय योजना, घरकुल योजना आणि शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी याबाबत माहिती दिली.

  शासनाच्या विविध योजनांसाठी कागदपत्रांची मागणी केली जाते, ती कागदपत्रे महिलांकडे नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलाच्या मदतीचे निकष बदलले जावेत, असे आग्रहाने सांगितले. महिलांच्या पुनर्वसनाची मागणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक बुरम, सचिन बोरुडे, फिरोज पठाण, वेद पाठक, जया जोगदंड, फिरोज पठाण, रवी निवारे सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी, तर आभार सचिन बोरुडे यांनी मानले.
  शेवगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष वझीर पठाण यांचे आवाहन

Trending