आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेल्यानंतरही तिला हवे होते नवजात बाळ, त्यामुळे आईने केले असे काही, वाचून बसेल धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - कोणत्याही महिलेसाठी जीवनातील सर्वात मोठे सुख हे आई बनण्याचे असते असे म्हटले जाते. प्रत्येक महिलेला हा अनुभव घ्यायचा असतो. पण काहीवेळा आपण विचार करतो तसेच घडेल असे नाही. काही महिला आई बनू शकत नाहीत, तर काही जन्मतःच बाळ गमावतात. असेच काही घडले जपानच्या एका महिलेबरोबर 45 वर्षे वय असलेल्या या महिलेने मृत बाळाला जन्म दिला. त्या घटनेनंतर तिला एवढा धक्का बसला की तिने, बाळाचा मृतदेह स्वतःपासून दूर होऊ द्यायचा नाही असे ठरवले. त्यासाठी तिने जे काही केले ते धक्कादायक असेच होते. 


पाच वर्षे लॉकरमध्ये ठेवला बाळाचा मृतदेह 
हा प्रकार आहे जपानची राजधानी टोकियो येथील. याठिकाणी पोलिसांनी 49 वर्षांच्या या महिलेला अटक केली आहे. महिलेने पाच वर्षे तिच्या मृत बाळाला क्वाइन लॉकरमध्ये ठेवले होते. हे लॉकर यूग्यूसुडानी स्टेशनजवळ होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार महिलेने देखिल बाळाचा मृतदेह लॉकरमध्ये ठेवल्याचे मान्य केले आहे. 


स्वतःपासून दूर जाऊ द्यायचे नव्हते 
महिलेने सांगितले की, तिने मृत बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे ती अत्यंत दुःखी होती. तिला बाळाचा मृतदेह स्वतःपासून दूर करायचा नव्हता. त्यामुळे तिने मृत बाळाचा मृतदेह लॉकरमध्ये ठेवला. जेव्हा तिला घराबाहेर काढण्यात आले तेव्हा तिने हे सर्वकाही सांगितले. कोणीतरी बाळाचा मृतदेह शोधेल यासाठी लॉकरची किल्ली घरी ठेवली होती असे ही महिला म्हणाली. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, बाळाच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...