महिलेने स्वतःच्या एका / महिलेने स्वतःच्या एका महिन्याच्या बाळाला बादलीत बुडवून मारले, विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्नही केला

Dec 28,2018 11:13:00 AM IST

सांगली - येथील जत तालुक्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या स्वतःच्या एका महिन्याच्या चिमुरड्या बाळाची बादलीत बुडवून हत्या केली. त्यानंतर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यातून ती बचावली. पण या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर धक्कादाय माहिती समोर आली आहे.


जत तालुक्यात पोलिसांना दोन दिवसांपूर्वी एका महिन्याच्या एका बाळाचा मृतदेह आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा मात्र तपास पोलिसांना लागत नव्हता. पाण्यात बुडून त्या बाळाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले होते. पण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. बाळाच्या आईनेच त्याची हत्या केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या महिलेने पाण्याच्या बादलीत बुडवून अत्यंत निर्दयीपणे या बाळाची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. यामागचे तिने सांगितलेले कारण अत्यंत धक्कादायक असे होते.


हे कारण दिले...
पोलिसांना जेव्हा संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा त्यांनी महिलेची चौकशी केली. त्यात महिलेने सांगितले की, तिला अत्यंत गंभीर असा आजार जडलेला आहे. या आजारामुळे ती फार दिवस जगण्याची शक्यता नसल्याने पुढे बाळाचे काय होणार याची काळजी तिला सतावत होती. या काळजीमुळेच तिने भविष्यात बाळाचे हाल होऊ नये म्हणून त्याची बादलीत बुडवून हत्या केल्याचे सांगितले. बाळाची हत्या केल्यानंतर तिने त्याला विहिरीच्या कठड्यावर ठेवले होते.


आत्महत्येचा प्रयत्न
महिलेने बाळाची हत्या केल्यानंतर स्वतःदेखिल विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा जीव वाचला. महिलेचा जीव वाचल्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय निर्माण झाला आहे. महिलेने आत्महत्येचा बनाव केला असल्याचा संशय पोलिसांना असल्याची माहिती मिळते आहे.

X