Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | women killed in container accident in Market Yard Chowk

मार्केट यार्ड चौकात कंटेनरची दुचाकीस धडक, महिला ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 14, 2018, 11:32 AM IST

मार्केट यार्ड चौकात कंटेनरची दुचाकीला मागून धडक बसल्याने एक महिला ठार झाली. वैशाली केदारनाथ बिराजदार (वय ३४, रा. सध्या

  • women killed in container accident in Market Yard Chowk

    सोलापूर- मार्केट यार्ड चौकात कंटेनरची दुचाकीला मागून धडक बसल्याने एक महिला ठार झाली. वैशाली केदारनाथ बिराजदार (वय ३४, रा. सध्या रमणशेट्टीनगर, शेळगी, मूळ शिरपनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. त्या पती केदारनाथ बिराजदार आणि मुलगी दीक्षासह दुचाकीने (एम.एच १३ ए.के. ७२९१) जात होत्या. त्यावेळी दुचाकीस मागून कंटेनरची (आरजी ०२ जी बी २०८९) धडक बसली. त्यामुळे त्या दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालक केदारनाथ आणि मुलगी दीक्षा हे किरकोळ जखमी झाले.


    जखमीचा मृत्यू
    रविवारी झालेल्या ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी विनायक प्रभाकर यादव (वय ५७, रा. लष्कर) यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिला हॉस्पिटलसमोरून गुरुनानक नगरकडे जाणाऱ्या वळणावर त्यांच्या दुचाकीस ट्रकने (एमएच १२, सीएक्स २३६३) जोरदार धडक दिली.

Trending