आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 ते 5 च्या नोकरीने कंटाळली एका मुलाची आई, नंतर आली आयडिया अन् जीव धोक्यात घालून करू लागली अशी कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - ब्रिटनमध्ये राहणारी 23 वर्षांची रोजी पामर रोजच्या 9 ते 5 च्या नोकरीला कंटाळली होती. तिने एकदिवस कंटाळून नोकरी सोडली. नंतर तिला अशी एक कल्पना सुचली की, ती आता लाखो रुपये कमावू लागली आहे. एवढेच नाही तर रोजी आता सेलिब्रिटीही बनली आहे. पण ती जे काम करते त्यामुळे तिला रोज जिवाचा धोका असतो. 


पाण्यात राहून लाखोंची कमाई 
एका मुलाची आई असलेल्या रोजीने तिच्या सौंदर्याचा योग्य वापर केला. रोजीने स्वतःला जलपरी बनवले. ती म्हणाली, मी लहानपणापासून जलपरीची फॅन होते. मला कायमच जलपरी व्हावेसे वाटत होते. जेव्हा मी नोकरीला कंटाळले तेव्हा मी विचार केला की, आपले हेच स्वप्न का सत्यात उतरवू नये. आज मी त्यातून चांगली कमाई करत आहे. 


अशी बनली जलपरी 
- रोजीने जॉब सोडल्यानंतर सेव्हींमधून एक एक सिलिकॉनद्वारे तयार केलेली फिश टेल खरेदी केली. त्यावर तिने जवळपास 1200 पौंड म्हणजे एक लाख रुपये खर्च केले. त्यानंतर तिने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला संपर्क केला. ती कंपनी रोजीला मरमेड म्ङणजे जलपरीच्या रुपात पाहून आश्चर्यचकित झाली. 
- कंपनीने तिला साइन केले आणि त्यानंतर रोजी अनेक इव्हेंट्समध्ये जलपरी बनून लोकांचे मनोरंजन करू लागली. लोकांनाही ते चांगलेच आकर्षक वाटते. 


पुढे वाचा.. का असतो जीवाला धोका.. 


 

बातम्या आणखी आहेत...