आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावातील महिलांना राहावे लागते निर्वस्त्र, तसे केले नाही तर घडते असे काही की..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जगभरात अशा अनेक प्रथा परंपरा असतात ज्यांच्या बाबत समजल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटत असते. आपल्या देशातही अशाच अनेक परंपरा आहेत ज्याबाबत आपल्याला कदाचित माहितीही नसेल. अशाच एका परंपरेबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. या परंपरेबाबत समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल यात काहीही शंका नाही. 


आपल्या देशामध्ये असेही एक ठिकाण आहे ज्याठिकाणी विवाहित महिला काही दिवसांसाठी निर्वस्त्र राहतात. म्हणजेच येथे महिला ठरावीक काळासाठी कपडे परिधान करत नाहीत. हे ऐकायला काहिसे विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. महिला याठिकाणी वर्षातून पाच दिवस निर्वस्त्र राहतात. 


हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटीमध्ये असलेल्या पिणी या गावामध्ये ही प्रथा आहे. याठिकाणी महिला 5 दिवस कपडे परिधान करत नाही. या काळामध्ये महिला पुरुषांसमोरही येत नाहीत. दरवर्षी या गावामध्ये श्रावण महिन्यात ही परंपरा पाळली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जात आहे. ज्या कुटुंबातील महिला ही प्रथा पाळत नाही त्यांच्या घरात काहीतरी अशुभ घडले असे मानले जाते, त्यामुळे आजही ही प्रथा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...