Home | National | Madhya Pradesh | women look unconscious on power bill of 3 lack 40 thousand in Madhya Pradesh's Indore

गरीब रिटायर्ड कर्मचाऱ्याला वीज बिल आले तब्बल 3 लाख 40 हजार, म्हणाले- फक्त रात्रीच लाईटचा वापर करतो..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2019, 05:30 PM IST

पती-पत्नी म्हणाले- आम्ही फक्त रात्रीच लाईट लावतो, कसे भरणार इतके बिल

 • women look unconscious on power bill of 3 lack 40 thousand in Madhya Pradesh's Indore

  इंदुर(मध्यप्रदेश)- खजरानाच्या इलियास कॉलोनीमध्या राहणाऱ्या 55 वर्षीय बिलकिस बानो सोमवारी दुपारी मार्च महिन्याचे वीज बिल पाहून चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. पतीने त्यांना उचलले, पण त्यांच्या हातातील वीज बिल पाहून त्यांनाही धक्का बसला. फक्त एक किचन, एक रूमच्या 9 बाय 46 वर्गफुटाच्या घराचे वीज बिल होते 3 लाख 40 हजार 200 रूपये. नंतर शेजाऱ्यांनी त्यांना सांभाळले आणि हॉस्पीटलला घेऊन गेले.


  बिलकिस यांचे पती शफीक अहमद कुरैशी नागदाच्या एका फॅक्टरीमधून रिटायर्ड कर्मचारी आहेत. घरात फक्त ते दोघेच राहतात आणि कमाईचे कोणतेच साधन नाहीये. सुरुवातील बिल 400-500 रूपये येत होते. मागच्या महिन्यातच स्मार्ट मीटर लावले आहे.


  रात्रीच लावतात लाईट आणि टीव्ही
  शफीक यांनी सांगितले की, त्यांच्या घरात फक्त तीन बल्ब, एक टीव्ही, एक फ्रिज, दोन पंखे आणि एक कूलर आहे. टीव्हीपण ते फक्त रात्रीच लावतात. दिवसा लाईटचा उपयोग करत नाहीत. ते म्हणाले, आमचे कुटुंबदेखील दुसऱ्याच्या पैशांवर चालते, तर अशात मी इतके बिल कसे भरणार.


  ए.ई. म्हणाले- प्रिंटींगची गडबडी असेल
  ए.ई. राकेश शाह म्हणाले की, इतके बिल कसकाय आले, हे मी पाहूनच सांगू शकतो. त्या कुटुंबाला चिंता करण्याची गरज नाहीये. प्रिंटींगच्या गडबडीमुळे असे झाले असेल.

Trending