आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चिमुकल्यांसह २६ वर्षीय विवाहित बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 औरंगाबाद-वाळूज एमआयडीसी परिसरातील हरिओमनगर येथे पतीसोबत राहणारी २६ वर्षीय विवाहित महिला दोन चिमुकल्यांसह ३० ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी भीमराव रमेश आरके यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. 


भीमराव रमेश आरके (रा. हरिओमनगर, ता. गंगापूर) हे पत्नी संगीता भीमराव आरके (२६), मुलगा मयुरेश भीमराव आरके (५) व मुलगी खुशी भीमराव आरके (१.५) हे सोबत राहतात. ३० ऑक्टोबर रोजी मुलांना सोबत घेऊन दुकानातून काही तरी घेऊन येते, म्हणून घराच्या बाहर गेली, मात्र परत आलीच नाही. तिचा नातेवाइकांसह सर्वत्र शोध घेऊनही ती कुठे आढळून आली नाही तसेच आजतागायत घरी आली नाही. त्यामुळे संगीता दोन चिमुकल्यांसह बेपत्ता झाल्याची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी के. बी. जगदाळे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...