आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महिला विभागप्रमुखाचा विनयभंग, सहप्राध्यापकावर गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सहप्राध्यापकाने महिला विभाग प्रमुखाची विभागातच छेड काढल्याचा प्रकार ३ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला. त्यांच्या तक्रारीवरून प्राध्यापक सय्यद अझरोद्दीन (५१, रा. छावणी) विरोधात बेगमपुरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

अझरोद्दीन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. विद्यापीठातील एका महिला विभाग प्रमुखाच्या तक्रारीनुसार, अझरोद्दीन २०१६ पासून त्यांचा वाईट उद्देशाने पाठलाग करत आहे. मध्यंतरी त्या कुटुंबासह बाहेर असताना तेथेही अझरोद्दीनने पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ३ जानेवारी रोजी दुपारी दालनाबाहेर येताच अझरोद्दीनने त्यांना अडवले. बळजबरी बोलण्याचा प्रयत्न करत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्या तत्काळ उपकुलगुरू अशोक तेजनकर यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेल्या. तक्रार करत असतानाच त्या बेशुद्ध पडल्या. 

 

विशाखा समितीकडे देणार तक्रार 
महिला विभागप्रमुखाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात अझरोद्दीन विरोधात तक्रार दिली. त्यावरून त्याच्याविरोधात कलम ३५४ ड (चोरून पाठलाग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अझरोद्दीनची विद्यापीठातील विशाखा समितीकडे तक्रार करणार असल्याचे महिला प्राध्यापिकाने सांगितले.