आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची छेड काढली; पीडितेच्या भावाकडून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, जळगावातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विवाहितेची छेड काढल्याच्या कारणावरून तिच्या भावाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजता फुपनगरी गावाजवळ घडली. या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तालुका पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयितास अटक केली आहे. 

 

नशिराबाद येथील बारादरी मोहल्ला येथील रहिवासी अमजद खान खलिल खान पठाण (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रामचंद्र कडू मरसाळे (वय २४, रा. फुपनगरी) याने अमजदला मारहाण केली आहे. मरसाळे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाहनचालक असलेला अमजद हा रविवारी नशिराबाद येथील मित्र अफसर अली मुन्सफ अली याच्यासोबत दुचाकी (एमएच -१९, यू -७११३)ने कानळदा येथे गेला होता. तर अफसर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अमजद हा रविवारी सकाळी जळगावात दाणाबाजारात आला, यानंतर त्याने फोन करून पैसे मागितले. पैसे देण्यासाठी अफसर जळगावात आला. त्याने अफसरकडून ४०० रुपये घेतले व आपल्याला कानळदा येथे पैसे घेण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. यानंतर दोघे जण अफसरच्या दुचाकीने कानळदा येथे गेले.

 

पैसे न मिळाल्यामुळे तेथून परत येत असताना अमजद याने फुपनगरीच्या दिशेने दुचाकी घेण्यास सांगितले. नशिराबाद येथील राधिका नावाच्या विवाहितेस भेटायचे आहे, असे अमजदने सांगितले होते. त्यानुसार अफसर याने दुचाकी वळवली. गावापासून जवळपास ४०० मीटर आधीच रस्त्याच्या कडेला राधिका एका लहान मुलीसह येत असल्याचे अमजदला दिसले. याच दरम्यान, रस्त्यावर गुरे आल्यामुळे अमजद दुचाकीवरून खाली उतरला. काही अंतर पढे जाऊन तो राधिका सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. 


अमजद याच्या पश्चात आई सुगराबी खान, वडील खलिल खान, लहान भाऊ शकील, पत्नी संजिदाबी आणि अयान व अबुबकर ही दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी अफसर याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या आधी अमजद व अफसर यांनी मद्यपान केले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. अमजद खान याने यापूर्वीदेखील काढली होती छेड 
रामचंद्रची विवाहित बहीण राधिका हिचे नशिराबाद हे सासर आहे. तर अमजद नशिराबादचाच रहिवासी आहे. अमजदने यापूर्वी नशिराबाद येथेही राधिकाची छेड काढली होती. दरम्यान, ५ जानेवारीपासून राधिका माहेरी म्हणजेच फुपनगरी येथे आलेली होती. तर अमजद हा रविवारी दुपारी फुपनगरीकडे गेला होता. राधिका समोर येताच त्याने पुन्हा छेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर रामचंद्रने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा जबाब राधिकाने पोलिसांना दिला आहे. 
 


 

 

बातम्या आणखी आहेत...