आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई येथील महिलेचा खून, पैशासाठी युवकाला करत होती ब्लॅकमेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन सातत्याने पैसे मागणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथील महिलेचा खून करून दोघा जणांनी तिचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथे पुरल्याची घटना उघडकीस आली आहे.


कविता  चव्हाण (२२, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या महिलेचे नाव आहे.  गावातील मोहन  राठोड याला ती सारखे पैसे मागत असे. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने मोहनला दिली.  धमक्यांमुळे संतापलेल्या मोहनने पांडुरंग रावसाहेब पवार (रा. शिराढोण तांडा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्या मदतीने कविताच्या खुनाचा कट रचला. माझ्या भावजीकडून तुला १० हजार रुपये घेऊन देतो, असे आश्वासन देऊन १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता मोहन कविताला दुचाकीवरून (एमएच ४४ व्ही १५९४) उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोणला घेऊन गेला.  गोराज नावाच्या शेतात रात्री मोहनने दोरीच्या साह्याने गळा आवळून कविताचा खून केला.  मध्यरात्रीतून पांडुरंगच्या मदतीने तिचा मृतदेह पोत्यात घालून खड्ड्यात पुरला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप यादव यांच्या फिर्यादीवरून मोहन राठोड आणि पांडुरंग पवार या दोघांवर बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.

 

तपासात उलगडा :  कविता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी १२ मे रोजी बर्दापूर ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना फौजदार यादव यांना त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यांनी मोहनला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची इत्थंभूत माहिती दिली.
 

बातम्या आणखी आहेत...