आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women, Muslims And Christian Candidates Get Within Ten Percent In Assembly Election

महिला, मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवार दहा टक्क्यांच्या आतच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीप्ती राऊत 

नाशिक  - निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारी वाटपापासून मतांच्या गणितांपर्यंत जातीधर्मांची गणिते सर्वच पक्ष मांडताना दिसतात. परंतु, महिला, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या राजकीय सहभागाबद्दलची उदासीनता सर्वपक्षीय उमेदवारी वाटपातून दिसून येते. या तिन्ही घटकांसाठी सर्वच पक्षांनी दिलेल्या या समाज घटकातील उमेदवारांची टक्केवारी दहा टक्क्यांच्याही पुढे जात नाही. परिणामी महिला आणि मुस्लिम उमेदवारांमध्ये ‘अपक्ष’ लढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

एमआयएमचा आधारच मुस्लिमकेंद्री राजकारण हा असल्याने त्यांनी मुस्लिम उमेदवार देणे स्वाभाविकच. परंतु, राज्यभरातील अपक्ष उमेदवारांमध्ये मुस्लिम उमेदवारांची सख्या लक्षणीय असल्याने एमआयएम किंवा मुस्लिम लीगसारखे ‘मुस्लिम’ आधारावर निर्माण झालेले पक्षही मुस्लिमांना पूर्ण प्रतिनिधित्व देऊ शकलेले नाहीत हेच यातून सिद्ध होते.
 

भाजपकडूनही एकही मुस्लिम उमेदवार नाही 
‘सर्वांचा विकास’ साधलेल्या भाजपतर्फे एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला नाही. शिवसेनेने एक उमेदवार दिला, परंतु तोही काँग्रेसमधून आयात केलेला. 

आघाडीचीही तीच गत 
मुस्लिमांच्या मतांवर राजकारणारे काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्षही यास अपवाद नाहीत. त्यांच्या मुस्लिम उमेदवारांची संख्याही अनुक्रमे ४ आणि ३ टक्क्यांच्या पुढे पोहोचलेली नाही. 
 

ख्रिश्चन उमेदवार कुणाचे किती
भाजप : २, शिवसेना: ०, काँग्रेस : १,राष्ट्रवादी : ०, वंचित बहुजन आघाडी १, अपक्ष : ४, इतर: १
 

यंदा फक्त २९६ महिला उमेदवार रिंगणात 
निम्म्या संख्येने असलेल्या महिलांबाबतची उदासीनता अधिकच चिंताजनक आहे. सत्ताधारी, विरोधक, प्रस्थापित, प्रयोगशील कोणत्याच पक्षाच्या महिला उमेदवारांची संख्या १० टक्क्यांच्या पुढे नाही.
भाजप १६५ पैकी १६, शिवसेना १२६ पैकी ०७, काँग्रेस १५० पैकी १४, राष्ट्रवादी  १२४ पैकी ०८, मनसे १०४ पैकी 
0८, बसप २७४ पैकी १२.
 

मुस्लिम उमेदवार

भाजप     १६५ पैकी ०
शिवसेना     १२६ पैकी १
काँग्रेस     १५० पैकी ७
राष्ट्रवादी     १२४ पैकी ४
वंचित     २४२ पैकी १९
मनसे     १०४ पैकी ०
आप     ७
एमआयएम     २७
अपक्ष     १४७
इतर पक्ष     ६२