आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजबच....या गावात नाही एकही पुरुष, तरीही महिलांना होते गर्भधारणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेरोबी - आफ्रीकेच्या एका गावात पुरुषांवर 29 वर्षांपासून येथे पुरुषांना राहण्यास बंदी आहे. पण असे असूनही येथील महिलांना गर्भधारणा होते. अनेक दिवसांपासून आफ्रीकेच्या यूमोजा गावासंबंधी विविध गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत. पण आज आम्ही आपणास या गावासंबंधी खरी गोष्ट सांगत आहोत.

 

1990 मध्ये पुरुषांवर घालती होती बंदी

> आफ्रीकेच्या घनदाट जंगलामध्ये वसलेल्या या गावाच्या आसपास पुरुषांना फिरण्यासही बंदी आहे. ही बाब पूर्णतः सत्य आहे. 1990 मध्ये ब्रिटीश जवानांनी 15 महिलांवर बलात्कार केला होता. नंतर महिलांच्या निवासासाठी हे गाव तयार करण्यात आले होते.

 

> तेव्हापासून बलात्कार. बाल विवाह, घरेलू हिंसा आणि खतना यांसारख्या हिंसा पीडित महिला येथे वास्तव्यासाठी येत आहेत. यामुळेच या गावात पुरुषांना येण्यास बंदी घातली आहे. आफ्रीकेतील सिंगल-सेक्स कम्युनिटी असणारे हे एकमेव गाव आहे.

 

गर्भवती होणाऱ्या महिलांचे सत्य

> या गावात पुरुषांची लोकसंख्याच नाहीये तर मग या महिला आपोआप गर्भवती कसे काय होतात? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. यामागे दोन तर्क आहेत. पहिला असा की, येथे राहण्यासाठी आलेल्या पीडित महिला अगोदरच गर्भवती होत्या, ज्यांच्याविषयी ऐकून लोकांनी त्या आपोआप प्रेग्नंट होण्याची अफवा उडवली.

 

> तर दुसरा तर्क असा आहे की, या गावात पुरुषांना बंदी असेल पण महिलांना दुसऱ्या गावात आणि शहरांमध्ये जाण्याची पाबंदी नाहीये. त्यामुळे दुसऱ्या गावातील आवडत्या पुरूषाबरोबर संबंध ठेवून प्रेग्नंट होतात. पण अद्यापही हे खरे आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाहीये. आजुबाजूच्या गावातील लोक या महिलांना चोरून दुसऱ्या गावात जात असल्याचे बोलत आहेत.

 

इतकी झाली आहे लोकसंख्या

> 15 महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या या छोट्याशा गावाचा विस्तार झाला आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार आता या गावात 250 महिला राहत आहेत. यातील अनेक महिलांनी मुलांना जन्म दिला आहे.

 

पर्यटनासाठी येतात लोक
> चर्चेचा विषय ठरलेल्या या गावात पर्यटक भेट देत आहेत. महिलांना या गावात प्रायमरी स्कूल, कल्चरल सेंटर आणि नॅशनल पार्क उभारले आहे. त्यांनी येथे पर्यटनासाठी मोहीम सुरू केली आहे. याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. त्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारले जात आहे. पर्यटनातून येणारा पैसा गावाच्या विकासासाठी खर्च केला जातो. पण येथे मुक्कामी थांबण्यासाठी पर्यटकांना मनाई आहे.