आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दवाखान्याबाहेर लिहिले होते, वांझपणापासून सुटका.. पण प्रत्यक्षात हे कृत्य करत होती सुंदर महिला डॉक्टर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - लहान मुले विकणारे हायप्रोफाइल रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर गुरुवारी या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले. या प्रकरणात अडकलेल्या महिला डॉक्टर शानू मसीह यांच्या ब्लेश चिकित्सालयावर लिहिलेला रजिस्ट्रेशन नंबर शहरातील दुसऱ्याच प्रसिद्ध डॉक्टरचा निघाला. त्यामुळे आता पुन्हा नव्या अँगलने तपास सुरू झाला आहे. 

 

दस्तऐवज केले जप्त 
- टिकरापारा टीआय दिलीप सिसोदिया यांनी सांगितले की, डॉ. शानू यांचे राजेंद्रनगरमध्ये हे क्लिनिक सुरू आहे. मागे त्यांचे घरही आहे. त्याठिकाणी गर्भवती महिलांवर उपचार केले जात होते. 
- डॉक्टरच्या घरातून तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्याची डीग्री मिळाली आहे. 2004 मध्ये कोर्स पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या घर आणि क्लिनिकमधून मिळालेले दस्तऐवज जप्त केले असून त्याचे व्हेरीफिकेशन सुरू आहे. 

 

महिला डॉक्टर चालवायची एनजीओ
- पोलिसांनी सांगितले की, डॉ. शानू भारतीय मानवाधिकार न्यास सुरक्षा परिषद नवी दिल्लीशी संलग्न आहेत. त्यांच्याकडे परिषदेचे आयकार्डही आढळले आहे. त्यांनी स्वतःला परिषदेचे अध्यक्ष असल्याचे सांगितले आहे. तर फेसबूकवर त्यांनी नरेंद्र मोदी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा उल्लेख केला आहे. सोबतच चित्रपट निर्माताही आहे. 
- निपुत्रिक महिलांसाठी दीर्घ काळापासून काम करत अस्लयाचे त्यांनी म्हटले आहे. या माध्यमातूनच लहान मुलांची विक्री केली जात होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या क्लिनिकबाहेर लिहिले होते, - बांझपन से छुटकारा, कम खर्च में पाए खुशियां.. 
- या महिला डॉक्टरने भाजप, काँग्रेस नेते आणि हायप्रोफाइल लोकांबरोबरही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे. 
- सर्व दिखावा पाहून महिलेची पोहोच वरपर्यंत असल्याचे लोकांना वाटायचे. 


दीड-दीड लाखांत विकली मुले 
पोलिसांच्या मते, आरोपींनी चौकशीत मान्य केले की, दोन मुले दीड दीड लाखांत ओडिशा आणि झारखंडच्या दाम्पत्याला विकली आहेत. एवढेच नाही तर एका मुलाचा सौदा अंबिकापूर आणि दुसऱ्याचा रायपूरमध्ये करण्यात आला आहे. आरोपींनी मुले कायद्यानुसार दत्तक दिली जात असल्याचेही भासवले. जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून बाळ मिळेल. त्यामुळे प्रक्रियेला पैसा लागतो असे सांगून पैसे लाटले. पोलिसांनी चारही कुटुंबांना संपर्क केला आहे. सर्व चांगली कुटुंबे आहेत. 


खोटी डीग्री असल्याची चर्चा 
डॉ. शानू यांची डीग्रीही खोटी असल्याची चर्चा आहे. त्यांनी कोणताही कोर्सदेखिल केलेला नाही. त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले. डॉक्टरने त्यांच्या फेसबूकसह इतर सोशल मीडिया अकाऊंट्सवर स्वतः स्त्री रोग तज्ज्ञ असल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांची मदत करमाऱ्या महिला वाडेकरही नर्स आहेत. त्यांनीही त्यांच्या नावाने औषधाचे मेडिकल सुरू केले होते. त्याठिकाणी उपचारही करायच्या. त्याठिकाणी महिलांची प्रसुतीही व्हायची. 

 

बातम्या आणखी आहेत...