Home | Divya Marathi Special | Women play a major role in making society decent

आगीवर नियंत्रण, शेती, उद्योग शिकवणारी स्त्रीच; 42 हजार वर्षांचा इतिहास सांगतो तिच्या धडाडीची कहाणी

दिव्य मराठी | Update - Mar 08, 2019, 11:42 AM IST

मानवी संस्कृतीच्या विकासात महिलांचे ७ माेठेे योगदान

 • Women play a major role in making society decent

  सुमारे ४२ हजार वर्षापूर्वीचा इतिहास सांगताे की, महिलांनीच मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक शाेधांचा याेग्य वापर करण्यास स्वत: शिकली आणि इतरांनाही तीने शिकवले. आगीचा याेग्य वापर करण्यापासून ते काॅम्प्युटिंग पर्यंतचा प्रवास महिलांचीच देण आहे.


  ४२ हजार वर्षापूर्वी आगीपासून सुरक्षेची आणि स्वयंपाकाची कला शिकली
  ४२ हजार वर्षापूर्वी महिलांनी आगीवर नियंत्रण राखण्याचे काैशल्य प्राप्त केले. पुरूष शिकार करीत, महिला मुलांची देखभाल करीत. घरासारखे सुरक्षित ठिकाण नव्हते. अंधार, थंडी, जनावरांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षेचे काैशल्य आत्मसात केले.
  - शिकारीवर गेलेल्या पुरूषांच्या मदतीसाठी महिलांनी बनवली मशाल


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, याविषयी आणखी रंजक माहिती...

 • Women play a major role in making society decent

  २० हजार वर्षापूर्वी आेली माती तापताना पाहिले अन् बनवले भांडे
  मातीचे भांडे बनवणे देखील महिलांनीच शिकून घेतले. यास तार्किक आधार असा आहे, की मुले शिकारीसाठी जात असत. मुली आईसाेबत राहत. ते खेळताना चिखलापासून वस्तू बनवत आणि आगीत फेकत तेव्हा लक्षात आले की, आेली माती तापल्याने मजबूत बनते. येथून भांडी बनवण्यास सुरूवात झाली.

 • Women play a major role in making society decent

  १४ हजार वर्षापूर्वी पशुपालन व समूहात राहणे शिकली, शिकार घटली
  सुमारे १४ हजार वर्षापूर्वी महिलांनी आपल्या मुलांसाेबत गाय आणि कुत्रा यासारख्या पशूंची देखभाल सुरू केली. यामुळे जनावरे पाळीव झाली. गायीपासून लाेकांना दूध मिळू लागले. मांसाची टंचाई भासत नव्हती. त्यामुळे शिकारीचे प्रमाण घटले आणि लाेक एकत्र तसेच समूहात राहणे पसंत करू लागले.

 • Women play a major role in making society decent

  १० हजार वर्षापूर्वी बियाणांचा याेग्य वापर करीत शेती सुरू केली
  महिलांनीच इंधनासाठी जंगलातून लाकडे गाेळा करण्यास सुरूवात केली. या दरम्यान त्यांनी फळांतील बियांना अंकूर फुटताना पाहिले. हे पाहून महिलांमध्ये शेतीची समज जागी झाली. महिलांच्या या याेगदानामुले त्यांना जननी आणि देवीच्या रूपात पुजनाची प्रथा पडली.
   त्यापूर्वी सूर्य, चंद्र, समुद्र  यांना देवता मानून पूजन केले जात असे.

 • Women play a major role in making society decent

  ८ हजार वर्षापूर्वी धान्याची साठवण, व्यापार सुरू केला 
  प्राणी आणि आपत्तींपासून धान्याचे संरक्षण करण्यासाठी साठवण सुरू केली. लाेकसंख्या वाढीसाेबतच धान्याची मागणी वाढली तसे त्याचा व्यापार सुरू केला. यावर महिलांचे नियंत्रण हाेते. त्यामुळे बहुतेक जुन्या संस्कृती मातृसत्ताक हाेत्या.

 • Women play a major role in making society decent

  महिलांनी शाेधले आैषध, ठरली पहिली डाॅक्टर
  बाळाच्या जन्मासाेबत त्यास काही आैषधांचीही गरज भासते. त्यासाठी महिलांनी स्वत:साठी आणि बाळासाठी सुरक्षित आैषधे शाेधली. त्याचा प्रायाेगिक वापर केला. रक्तप्रवाह राेखणारे, जखम भरणारे आैेषधे वापरात आणली, आणि महिलाच पहिली डाॅक्टर ठरली.


  ६ हजार वर्षापूर्वी धातूच्या शाेधात उद्याेगाची पायाभरणी
  महिला हजाराे वर्ष मातीची भांडी घडवत असत. मातीत खनिजद्रव्ये असतात. महिलांनी मातीतील खनिजद्रव्ये वितळताना (द्रवरूप हाेताना) आणि पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर घनरूप हाेताना पाहिले. यामुळेच महिलांनी कांसे, तांबे आणि लाेखंडाचा शाेध लावला असण्याची दाट शक्यता आहे. येथेच आजच्या आैद्याेगिकीकरणाची पायाभरणी झाली.


  ३०० वर्षापूर्वी जीवनसुलभ करणाऱ्या संशाेधनावर सातत्याने भर
  संशाेधनाची जी परंपरा महिलांनी मानवी संस्कृतीच्या आरंभापासून सुरू केली, ती आजही सुरू आहे. मागील ३०० वर्षात महिलांनी अणूउर्जा, धुमकेतू, पाण्यात जीवनदायी ठरणारा तराफा, इंजेक्शन, आइसक्रिम मेकर, रेफ्रीजरेटर, कार हीटर, कंप्यूटर ऐल्गोरिदम, सीसीटीवी, बुलेट प्रूफ जैकेटमध्ये वापरात येणाऱ्या केवलारचा शाेध लावला. कारचे विंडशील्ड वाइपर आणि लैंग्वेज प्रोग्रामिंग सारखे संशाेधन केले आहे.


  स्रोत: एंथ्रोपोलॉजी की किताब- 1. व्हाट हैपेंड इन हिस्ट्री (गॉर्डन चाइल्ड) 2. अवर ओरिएंटल हेरिटेज (विल ड्यूरंट)

Trending