आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या वेदना पडद्यावर आणणाऱ्या महिला निर्मात्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश चित्रपट, पुरुष पात्रे केंद्रस्थानी ठेवून लिहिले जातात. पुरुषकेंद्रित चित्रपटातही नायिकाच नायकाला संघर्ष करण्यास प्रेरणा देते. अशा प्रकारे बहुतांश चित्रपट पुरुषांकडून दिग्दर्शित केले जातात. महिलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट तसे संख्येने कमी आहेत. भारतच नाही तर संपूर्ण जगाच्या चित्रपटसृष्टीत हीच परिस्थिती आहे.चित्रीकरणावेळी दिग्दर्शकच आज्ञा देतो, पण पुरुष तंत्रज्ञांना महिलेकडून आज्ञा स्वीकारणे योग्य वाटत नाही. भारतीय सिनेमाची पहिली दिग्दर्शिका नर्गिसची आई जद्दनबाई होती आणि त्यांच्यापासून झोया अख्तरपर्यंत परंपरा आली आहे. तिच्या ‘गली बॉय’ चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. अयशस्वी अभिनेता कामरानची मुलगी फराह खान पहिल्यांदा नृत्य दिग्दर्शक बनली. नंतर शाहरुख खान अभिनीत ‘ओम शांती ओम’पासून त्यांनी दिग्दर्शनास प्रारंभ केला. फराह खानने आपल्या चित्रपटांना पुरुषी चित्रपट म्हटले आहे, पण चित्रपटांमध्ये लिंगभेद असत नाही. नंदिता दास यांचे ‘एक रेटेड’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. यात अपर्णा सेन, मीरा नायर, शोनाली बोस, फराह खान, तनुजा चंद्रा, नंदिता दास, अंजली मेनन, किरण राव आणि अलंकृता श्रीवास्तवसारख्या महिला दिग्दर्शकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या अनेक वर्षांपूर्वी १९९८ मध्ये निर्मला बुराडिया यांनीही महिला चित्रपट निर्मात्यांवर पुस्तक लिहिले होते. नंदिता दास यांच्या पुस्तकात जे उल्लेख राहून गेले त्याची कसर निर्मला बुराडिया यांच्या पुस्तकात आहे. उदाहरणार्थ सई परांजपे, अरुणा राजे, कल्पना लाजमी, प्रिया दत्त इत्यादी. चित्रीकरणावेळी ‘अॅक्शन’ आदेश उच्चारला जाताच कलाकार अभिनय करतात आणि ‘कट’ म्हणताच कॅमेरा थांबतो. पण अॅक्शन म्हणून महिलेने पुकारलेले पुरुषांना आवडत नाही. अॅक्शन आणि ‘कट’ म्हणणे हा पुरुषांचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी भावना आजही आहे. हिटलरच्या काळात लेनी रिफेन्स्टाल ही त्याची आवडती निर्माती होती. तिच्या एका चित्रपटात हिटलरचे आवाहन दाखवण्यात आले होते. पहिल्याच शॉटमध्ये सूर्य हा हिटलरच्या डोक्याच्या मागे आहे आणि हिटलरची लांब सावली समोरच्या लोकांवर पडली आहे असे सूचक दृश्य दाखवण्यात आले आहे. त्याच्या आगमनावर रणवाद्ये वाजवणारे सक्रिय होतात. आजकाल कॅमेरे इतके करामती झालेले आहेत की, एका लेन्सच्या वापराने ५ हजारांची गर्दी ५० हजारांच्या संख्येत दाखवता येते. एक काळ असाही होता, जेव्हा इंदिरा गांधी, लंकेत सिरिमावो भंडारनायके, इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर या नेत्या होत्या. चित्रपट निर्माते आर. बाल्की यांची पत्नी गौरी शिंदे यांनी श्रीदेवी अभिनीत फिल्म ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने बरेच यश मिळवले आणि समीक्षकांनीही याचे कौतुक केले होते. महिला निर्मात्या अत्यंत संवेदनशील होत्या. ‘इंग्लिश विंग्लिश’च्या एका दृश्यात असे दाखवले आहे की, नायिकेचे दु:ख तिचा पती आणि मुले समजू शकत नाहीत, पण हजारो मैलावर राहणाऱ्या एका नातेवाइकाला समजते. निदा फ़ाज़ली यांची एक कविता आहे. ‘मैं रोया परदेस में भीगा मां का प्यार, दिल ने दिल से बात की बिन चिट्ठी बिन तार।’ या संवेदना अंतरांच्याही पलीकडे जातात. ग्वालियरचे कवी पवन करण यांच्या सर्व रचनांचे केंद्र स्त्रीच आहे. त्यांनी संशोधन करून पाैराणिक ग्रंथांमधील उपेक्षित महिलांच्या दु:खावर प्रकाश टाकला. त्यांच्या ‘स्त्री शतक’चे दोन खंड प्रकाशित झाले आहेत. यात ४५० महिलांच्या वेदनांचे चित्रण आहे. पाकिस्तानची सारा शगुफ्ता यांची एक कविता आहे - ‘औरत का बदन ही, उसका वतन नहीं होता, वह कुछ और भी है। पुरुष इच्छाओं की पतंग उड़ाते हैं, स्त्री आकाश ही नहीं कुछ और भी है।’ पाकिस्तानचा सर्व पुरुषी समाज सारा शगुफ्ता हिला इतका घाबरत होता की, तिला प्रथम वेडे ठरवले गेले, नंतर हत्या करून आत्महत्येचा बनाव केला गेला.

बातम्या आणखी आहेत...