आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Fear: Italy Returned Woman Who Left Husband In Corona Fear Tests Positive For Coronavirus In India

पतीला कोरोना होताच पसार झाली नववधू, तरीही चाचणीमध्ये तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

नवी दिल्ली - इटलीत हनीमून साजरे करून आलेल्या एका नववधूने आपल्या पतीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे कळताच पळ काढला. सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर तिला देखील आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी आग्रा येथे पसार झाली. मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचे नुकतेच लग्न झाले होते. यानंतर नवविहित दांपत्य हनीमूनसाठी इटली, तेथून ग्रीस आणि फ्रान्सला गेले. 27 फेब्रुवारीला ते मुंबईला आले आणि तेथून बंगळुरूत पोहोचले. 7 मार्चला तिच्या पतीची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यानंतर दोघांना आयसोलेट केले गेले. महिलेने ही गोष्ट आपल्या माहेरच्या लोकांना सांगितली. त्यांच्या सल्ल्याने ती आपल्या पतीला सोडून माहेरी निघून गेली.

महिला 8 मार्चला बंगळुरूहून दिल्ली आणि मग आग्र्याला आपल्या पालकांकडे गेली. जेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांना दिसले की, ती महिला 8 सदस्यांसोबत राहते. या सर्वांना आयसोलेट करण्याचे सांगितले गेले तेव्हा त्यांनी त्यांनी स्पष्ट नकार दिला. पण, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या दबावानंतर त्यांना वेगळ्या वार्डात दाखल करण्यात आले. 

तीन-तीन शहरे फिरली, सहप्रवाशांनाही धोका


महिला 8 मार्चला बंगळुरूहून नवी दिल्लीला फ्लाइटने आणि मग दिल्लीहून आग्रा ट्रेनने पोहोचली. आता तिचे ट्रॅव्हल डिटेल्स चेक केले जात आहेत. तिला रस्त्यात भेटलेल्या प्रवाशांना सुद्धा संसर्ग झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. अलीगड मेडिकल कॉलेजने महिला व्हायरसची रुग्ण असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्तर चाचण्या घेतल्या.