आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न आणि नोकरीचे आमिष देऊन अधिकाऱ्याने सहा महिने तरुणीवर केला बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कायमस्वरूपी नोकरी, लग्नाचे आमिष देऊन जळगावच्या विशेष समाजकल्याण अधिकाऱ्याने ‘बार्टी’मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणीवर सात महिन्यांपासून शहरातील गणपतीनगर भागातील राहत्या घरात अत्याचार केले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात समाजकल्याण अधिकाऱ्यासह त्याची पत्नी व वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित तरुणी जून २०१५ पासून सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीमध्ये कंत्राटी पद्धतीने समतादूत म्हणून काम करते आहे. सामाजिक न्याय विभाग सहायक आयुक्त तथा समाजकल्याण अधिकारी योगेश सुभाषराव पाटील याने तरुणीवर अत्याचार केला आहे. पाटील याने समतादूत म्हणून काम करणाऱ्यांचा व्हाॅट‌्सअॅप ग्रुप तयार केला आहे. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी जिल्हा उपकारागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटील याने संबंधित तरुणीला पहिल्यांदा पाहिले. यानंतर ३० नोव्हेंबर रोजी तिच्या व्हाॅट‌्सअॅपवर मेसेज करून कामाच्या निमित्ताने विचारणा केली. यानंतर दोन-तीन दिवस मेसेजच्या माध्यमातून अवांतर चर्चा करून तिच्याशी ओळख निर्माण केली होती. 
 

 

कर्कराेगाचे निदान झाल्यावर तोडले संबंध
काही दिवसांनी पाटील याने घरी तरुणीस जेवणाचा डबा घेऊन बोलावले. या वेळी ‘मी तुझ्या कायम सोबत राहीन, असे आमिष देत पाटील याने जबरदस्तीने तरुणीवर अत्याचार केले. नोव्हेंबर २०१८ पासून ते ३ मे २०१९ पर्यंत पाटील याने सातत्याने या तरुणीवर अत्याचार केले. दरम्यान, तरुणीस कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर पाटील याने तिच्याशी संबंध तोडले. त्यानंतर तरुणीने  पाटीलविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.