आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Women Send More 1 5 lakh Messages Warning Request And Threat After Man Reject Love Request

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमात वेडी झालेल्या महिलेने प्रेमीला पाठवले दीड लाखांहून अधिक मेसेज, प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यास दिली जीवे मारण्याची धमकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


फीनिक्स : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाला किती महत्व असते ते या महिलेने दाखवून दिले आहे. फीनिक्स, अॅरिझोना येथे राहणाऱ्या जॅकलीन अॅडस या महिलेने आपल्या प्रेमीला दीड लाखांहून अधिक मेसेज सेंड केले आहेत. पोलिसांनी तिला स्टॅकिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. एक व्यक्तीने तिच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तिने त्याला 1 लाख 59 हजार मेसेज पाठविले होते. 

 

एका रिपोर्टनुसार सदर महिला अनेकवेला त्या व्यक्तीच्या घरी गेली होती. या दरम्यान तिने तेथील बाथरूमचा देखील वापर केला. महिलेला गेल्या वर्षी मे महिन्यात फीनिक्स येथील तिच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेच्या कारमधून एक चाकू ताब्यात घेतला होता. 

 

मेसेजद्वारे धमकी, विनंती आणि चेतावणी देण्यात आली

जॅकलीन व्यवसायाने ब्यूटीशियन असून ती फ्लोरिडा येथे राहते. स्टॅकिंग रिपोर्टनुसार सुरुवातीला महिलेने आपल्या प्रेमीला 65 हजार मेसेज पाठवले होते. पण द अॅरिझोना रिपब्लिकच्या रिपोर्टनुसार पाठविण्यात आलेल्या मेसेजची संख्या तब्बल 1 लाख 59 हजार असल्याचे सांगितले. महिलेद्वारे पाठविण्यात आलेल्या मेसेजमध्ये धमकी, विनंती आणि चेतावनी देण्यात आली होती. 

 

मेसेजमध्ये दिली जीवे मारण्याची धमकी

महिलेने सेंड केलेल्या एका मेसेजमध्ये लिहीले होते की, येथे येण्यासाठी तुला जे करायचे आहे ते कर, पण मला सोडून जायचा प्रयत्न करू नको. मी तुला मारून टाकेल आणि माझी कोणाचा खून करायची इच्छा नाही. 

 

महिला आणि व्यक्तीची एका डेटिंग वेबसाइटवर भेट झाली होती. यानंतर दोघे डेटवर सुद्धा गेले होते. महिलेने त्याच्या सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याने नकार दिला. तेव्हापासूनच महिलेने त्या व्यक्तीला मेसेज करण्यास सुरुवात केली होती.