आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइड: पतीच्या चुकीची चिमुरड्यांना शिक्षा, जळून कोळसा झाली 2 मुले, महिलेसहित 2 मुलांचा मृत्यूशी संघर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हमीरपूर (उत्तर प्रदेश) - येथे महिलेने आत्मदहन केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने स्वत:सोबतच तिच्या 4 मुलांनाही आग लावली. आग लावल्यानंतर 2 मुलांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे महिलेसहित 2 मुले गंभीर भाजल्याने अत्यवस्थ झाली आहेत. तिघांची नाजूक प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना झांसी शहरात रेफर केले आहे.

 

महिलेचे नाम प्रेमवती आहे. ती पतीच्या दारूच्या व्यसनापायी त्रस्त होती. महिला आणि तिच्या पतीमध्ये सारखी भांडणेही व्हायची. कुटुंबात पैशांची चणचण सुरू होती. या त्रासामुळेच महिलेने जाळून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांना कळली तेव्हा सर्व जण गंभीररीत्या भाजले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. पोलिस म्हणाले की, महिला आणि तिच्या पतीमध्ये दारूच्या व्यसनामुळे भांडण झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...