Khabrein Jara Hat / घरात साफसफाई करताना महिलेला सापडली स्वतःच्या लग्नाची CD, सीडी पाहिल्यानंतर महिलेला बसला जबरदस्त शॉक; म्हणाली असे कसे होऊ शकते

सीडी पाहिल्यानंतर महिलेचे सासूविषयीचे मत बदलले 

दिव्य मराठी

Jun 01,2019 12:07:00 PM IST

खबरे जरा हटके डेस्क. : एका महिलेला घराची साफसफाई करणे चांगलेच महागात पडले आहे. सफाई करताना तिला एक सीडी सापडली होती. त्यामध्ये तिच्या लग्नाचे फोटोज होते. लग्नाच्या सात वर्षांनंतर मिळालेल्या या सीडीमुळे तिला अजबच वाटले. पण सीडीवर सासू्च्या हस्ताक्षर पाहून तिने ते फोटो बघण्याचा निर्णय केला. पण तिने त्या सीडीतले फोटो बघितल्यानंतर महिलेचा आपल्या सासुवरील विश्वास नाहीसा झाला. त्या सीडीमध्ये तिच्या लग्नाचे 400 हून जास्त फोटोज होते. पण त्यातील एकाही फोटोमध्ये ती महिला नव्हती.


सात वर्षापर्यंत दिसली नव्हती सीडी....

- एका महिला युझरने mumsnet.com या सोशल मीडिया साइटवर CountryMarch नावाने ही स्टोरी पोस्ट केली होती.

- महिलेने सांगितले की, एक दिवस घरातील साफसफाई करताना एका जुन्या ड्रावरमध्ये तिला आपल्या लग्नाची एक सीडी मिळाली. त्यावर सासूनच्या हस्ताक्षरामध्ये 'बेनच्या लग्नाचे फोटो' असे लिहीले होते.

- सीडीवरील सासूचे विचित्र हस्ताक्षर पाहताच महिलेने त्या सीडीमधील फोटो पाहण्याचा निर्णय घेतला. खरं तर तिला लग्नाच्या सात वर्षानंतर सीडी मिळाल्यामुळे ती हैराण झाली होती.

- त्यानंतर महिलेने लगेच ती सीडी लॅपटॅपमध्ये प्ले केली. त्या सीडीमध्ये त्यांच्या लग्नाचे 400 हून अधिक फोटोज होते. पण त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्या सर्व फोटोंमध्ये तिचा एकही फोटो नव्हता.

सासुबद्दलचे मत पूर्णपणे बदलले

- महिलेने लिहीले की, सीडी बघितल्यानंतर मला खूप राग येत होता. माझ्या सासुने पैसे दुसऱ्याच फोटोग्राफरला हायर केले होते आणि मी फोटोत दिसणार नाही अशाप्रकारचे फोटोशूट केले होते. तसेच सात वर्ष माझ्यापासून हे लपवून ठेवले.

- या घटनेनंतर सासुबद्दलचे माझे मत पूर्णपणे बदलले आहे आणि आता आमच्यात पूर्वीसारखे मैत्रीचे नाते राहिले नाही. महिलेने जेव्हा या फोटोंबद्दल आपल्या पतीला सांगितले तेव्हा तो काहीच न बोलता फक्त मोठ्याने हसत होता.

X