आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लीड्स - इंग्लंडच्या लीड्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने एक ड्रेस ऑनलाइन मागवला होता. पण तो ड्रेस परिधान करून ती जर बाहेर गेली असती तर तिला अटक झाली असती असे तिचे म्हणणे आहे. 23 वर्षांची हॉली स्मिथ लीगल अॅडव्हायजर म्हणून काम करते. हॉलीने एका वेबसाइटवरून तिच्यासाठी एक ड्रेस मागवला होता. पण ड्रेस पाहून तिला आनंदाऐवजी फक्त मनस्तापच झाला.
हॉलीने सांगितले की, तिने या साइटवरून एक काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस खरेदी केला होता. साइटवर हा ड्रेस तिच्याच साइजचा असल्याचे सांगण्यात आले होते. ठरलेल्या वेळेत हा ड्रेस घरी डिलिव्हर झालादेखिल त्यानंतर हॉलिने पार्टीसाठी हा ड्रेस उघडला.
हॉलीने हा ड्रेस परिधान केला तर त्याची साइज पाहून तिला धक्काच बसला. तो एवढा लहान होता की, तिचे पाय मांड्यांपर्यंतही झाकले जात नव्हते. वेबसाइटवर मात्र तो ड्रेस गुडघ्याच्या खालपर्यंत असल्याचे दाखवलेले होते. त्यामुळे हॉलीला प्रचंड मनस्ताप झाला होता.
यामुळे पोलिसांनी केली असती अटक.. पुढे वाचा..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.