आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानात पोहोचताच समोर दिसले असे काही, पळत सुटली महिला.. परिसरात सगळीकडे दहशतीचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Demo Pic. - Divya Marathi
Demo Pic.
नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या ग्रीनपार्क येथील स्माशानभूमीत एक विचित्र घटना समोर आली आहे. कचरा वेचणाऱ्या एका महिलेने याठिकाणी असे काही पाहिले की लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हे दृश्य पाहातच ती ओरडत सुटली आणि तिने याबाबत इतरांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस त्याठिकाणी आले आणि तपास सुरू झाला. या महिलेने स्मशानभूमीमध्ये एक मृतदेह नग्नावस्थेत पडलेला पाहिला होता. 
 
परिसरात दहशत 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्माशानभूमीत आढळलेला मृतदेह नग्न अवस्थेत तर होताच पण त्याबरोबरच काही विकृत लोकांनी त्याची विटंबना केल्याचेही समोर आहे. मृतदेहाचे शीर कापलेले होते. हे शीर मृतदेहापासून 50 मीटर अंतरावर आढळून आले.  या मृतदेहाचा हात एका शर्ट, बनियान आणि पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने बांधण्यात आला होता. पोलिसांना मृतदेहाच्या हातावर एक खूण आणढळी आहे. त्यावरून मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजावरून हा पूर्वनियोजित हत्येचा प्रकार असल्याचे पोलिस म्हणाले आहेत. हा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 
 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...