माझे तुझ्यावर प्रेम / माझे तुझ्यावर प्रेम आहे.. असे सांगत त्याने विवाहितेकडे केली शरीर सुखाची मागणी, नंतर जे घडले ते पाहून सगळेच झाले दंग

प्रतिन‍िधी

Mar 08,2019 07:32:00 PM IST

यावल- मागील चार दिवसांपासून एका 23 वर्षीय भामटा विवाहितेची छेड काढत होता. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत मनात लज्जा उत्पन्न असे कृत्य करत होता. समाजात बदनामी होईल,म्हणून विवाहितेसह तिचे नातेवाईक गप्प होते. मात्र, भामट्याला धडा शिकविण्यासाठी ‘त्या’ विवाहितेने धाडस दाखविले.

यावलच्या व्यास मंदिराच्या उद्यानात भेटू, असा भामट्याला संदेश पाठवला. तिने भामटा पोहोचताच विवाहितेच्या पतीसह नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला. नंतर त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. आरोपीविरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला आहे.

मिळालेली माहिती अशी की,पीडिता सातोद येथील रहिवासी आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तुषार एकनाथ फेगडे (रा.सातोद, हल्ली मुक्काम चितोडगड, राजस्थान) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जाता-येता विवाहितेची छेड काढत होता. तुझ्यावर प्रेम आहे, असू सांगून शरीर सुखाची मागणी करत होता. विवाहितेने सर्व प्रकार पतीला सांगितला. परंतु समाजात आपली बदनामी होईल, म्हणून तोही गप्प बसला. मात्र, आरोपीने पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तेव्हा पीडितेने कंबर कसली आणि भामट्याला धडा शिकविण्याचा निर्धार केला. आरोपीला तिने मोबाइलवरून मेसेज पाठवून व्यास मंदिराच्या उद्यानात बोलावले. आरोपी गुरूवारी दुपारी उद्यानात पीडितेची वाट पाहात बसला होता. विवाहितेच्या पतीसह नातेवाईकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

X
COMMENT