Home | International | Pakistan | women trained prisoner yoga in pakistan jail

पाकिस्तानमध्ये तुरुंगातील कैद्यांना योगाचे शिक्षण

Agency | Update - May 23, 2011, 02:48 PM IST

तुरूंगातील महिलांच्या मन:शांतीसाठी त्यांना योगाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न एक पाकिस्तानी महिला करत आहे.

  • women trained prisoner yoga in pakistan jail

    इस्लामाबाद - तुरूंगातील महिलांच्या मन:शांतीसाठी त्यांना योगाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न एक पाकिस्तानी महिला करत आहे. आशा छपरा यांनी समाज कार्यामध्ये पदवी प्राप्त केली असून महिलांच्या मन:शांतीसाठी त्यांना योगाचे शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी कॅनडातून परत येण्यापूर्वी दोन वर्षापूर्वीच घेतला होता.

    तुरूंगात असणाऱ्या महिलांना योग शिकवण्यासाठी तुरूंगाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ईमेल करून परवानगी मागितली होती. गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगातील 30 ते 40 महिलांना त्यांनी योगाचे शिक्षण दिले आहे. या योगा वर्गाच्या सुरूवातीला फक्त सहा महिला योगा शिकायला येत होत्या. 20 ते 40 वयोगटातील महिलांना आणि लहान मुलांना देखील योगा शिकण्याची परवानगी होती. तुरूंगाच्या आवारातच ज्या महिला कैदी बाहेर येऊ शकतात अशांना आशा या विनाशुल्क योगा शिकवायला येत होत्या. त्यांच्या योग शिक्षणामुळे अनेक महिला कैदी आनंदी आणि उत्साही रहायला लागल्या होत्या. ज्या महिला शिक्षा भोगत होत्या त्यांना आयुष्यात काहीही ध्येय नव्हते. ज्या महिला उदास आणि दिशाहीन होत्या त्यांना योगाच्या सहाय्याने जीवनाचा एक प्रकारचा मार्ग मिळाला, मन:शांती मिळाली. आशा जेव्हा महिलांना योगा शिकवायला येत होत्या तेव्हा त्यांची अनेक जणांनी खिल्ली उडवली. मात्र महिला आणि मुलांचा योगाच्या प्रती मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी त्या महिलांना आपला मित्र बनवले.

    आशा छपरा यांना तुरूंगात छान शिकवण मिळाली. त्यांनी सांगितले की मी जेवढे शिकवले त्यापेक्षा मला जास्त प्राप्त झाले. तुरूंगातील या महिलांबरोबर त्यांचे छान मैत्रिचे संबंध जुळले. या महिलांमध्ये स्वतंत्र होण्याची इच्छा त्यांनी जागृत केली.

    आशा यांनी तुरूंगातील महिलांना योगाचे शिक्षण देण्याशिवाय कराचीत इतरत्र योगाचे वर्ग घेतले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी महिला कैद्यांसाठी चटया खरेदी केल्या. प्रत्येक गोष्ट आशा यांना सोपी गेली नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत काहीना काही अडचण आलीच आहे असे त्यांनी सांगितले.

Trending