आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला जाणून असते, की पुरुष तिला कोणत्या उद्देशाने पाहतो किंवा स्पर्श करतोय : हायकोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​मुंबई : एअर विस्ताराच्या विमानात अभिनेत्रीची छेड काढल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे की, “एखाद्या महिलेस कदाचित कमी माहिती असेल. परंतु, स्पर्श किंवा एकटक पाहण्यातून तिच्या लक्षात सगळे काही येते. तिला ही नैसर्गिक देण आहे. पुरुषाला वाटते महिलेचे लक्ष नाही. परंतु त्याचा उद्देश महिला पुरता ओळखून असते.’ १० डिसेंबर २०१७च्या घटनेबद्दल ही सुनावणी सुरू होती. एका अल्पवयीन अभिनेत्रीने आरोप केला होता की, बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत असताना मागे बसलेले ४१ वर्षीय व्यावसायिक विकास सचदेव यांनी आपले पाय मुद्दाम माझ्या सीटच्या हँडरेस्टवर ठेवले होते. सत्र न्यायालयाने १५ जानेवारी २०२० रोजी विकास यांस कलम ३५४ व पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावर विकासने हायकोर्टात अपील केले आहे. याबाबतची कोर्टातील प्रश्नोत्तरे...

हे काही गणित नाही, महिलांनी अशा घटनांवर कशी प्रतिक्रिया द्यावी, असे कोणतेही सूत्र नाही

अनिकेत निकम (विकासचे वकील) : माझ्या अशिलास दोषी ठरवणे चुकीचे आहे. त्यांच्या पायाचा धक्का पीडितेला लागला. ती कदाचित चूक ठरू शकते. मात्र, यामागे छेडछाडीचा उद्देश नव्हता.
न्या. चव्हाण : केवळ पीडिताच या उद्देशाबद्दल सांगू शकते. आरोपी चूक कधीच मान्य करणार नाही. विकास बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते. तेथे भरपूर जागा असते. मग, पाय दुसऱ्याच्या सीटवर ठेवलेच कशाला? महिलेला भलेही कमी माहिती असेल, परंतु पुरुषांचा स्पर्श व त्याचा उद्देश ती चांगले जाणून असते.
वकील : पीडितेने तक्रार केली नाही. शिवाय, हसत हसत विमानातून उतरली.
न्या. चव्हाण : हे काही गणित नाही. अशा घटनांवर महिलांनी कसे वागावे किंवा कशी प्रतिक्रिया द्यावी याचे काही ठोस असे सूत्र नाही. 
वकील : पीडिता आणि इतर प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्ये विरोधाभास आहे. क्रू मेंबर्स म्हणतात की आरोपी संपूर्ण प्रवासात विमानात झोपलेला होता.

इन्स्टाग्रामवर पोस्ट

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर म्हटले होते की, मागे बसलेली व्यक्ती आपल्या पायाने कधी माझ्या मानेला तर कधी पाठीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, मंगळवारी कोर्टाने सचदेवच्या शिक्षेला सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली.