आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबर्मिंघम- इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेचे एका बॅक्टेरीयामूळे जगणे कठीण झाले आहे. महिलेचे नाव डोना कॉर्डन (वय47) असुन एका प्राणघातक बॅक्टेरियामूळे तिचा आर्धा चेहरा खराब झाला आहे. हा बॅक्टेरिया हळुहळु तिच्या डोक्याच्या भागावर पसरत असून तिचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्याचा आर्धा भाग काढून टाकला आहे.
चेहऱ्यावरील जखमेला किरकोळ समल्याची चुकी
> डोनाला अर्थरायटीसचा आजार असल्यामूळे तिचे संतुलन बिघडले आणि ती किचनमधील फर्शीवर पडली. फर्शीवर पडल्यानंतर तिच्या कपाळाला ओव्हनचे हँडल लागल्यामूळे तिला जखम झाली.
> डोनाला जखम झाल्यानंतर 24 तासांतच ती गंभीर आजारी झाली आणि तिच्या चेहऱ्यावरील स्किन काळी पडली. त्यानंतर डोनाच्या मुलीने तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले.
बॅक्टेरियामूळे शरीराच्या अनेक अवयवांनी कार्य करणे बंद केले होते.
> आजारी झाल्यानंतर तिच्या शरीराच्या अनेक अवयवांनी कार्य करणे करणे बंद केले होते. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिचा चेहरा खराब होण्यामागे अतिशय दुर्मिळ आणि प्राणघातक बॅक्टेरिया असून त्याचे नाव necrotising fasciitis आहे. या बॅक्टेरियामूळे तिचा चेहरा सडून तिच्या शरीरातील इतर अवयवांनी कार्य करणे बंद केले होते.
सुरू झाले गुंतागूंतीचे ऑपरेशन
> डॉक्टरांनी जवळपास तीन तासांच्या सर्जरी करुन तिचे डेड टिशू आणि सडलेला चेहरा काढुन टाकला. ऑपरेशन सुरू असताना डोना कोमात गेली. चेहरा पुर्ण करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांनी तिच्या मांडीच्या मांसचा वापर करुन आर्धा चेहरा बनवला आणि जवळपास 11 तासांच्या सर्जरीनंतर त्याला जोडण्यात आले.
स्वत:चा चेहरा पाहून हादरली डोना
> ऑपरेशन झाल्यानंतर 4 दिवसांनी डेाना कोमातून बाहेर आली. तिचे प्राण वाचले होते परंतू तिचा चेहरा पाहिल्यानंतर ती हादरून गेली. त्यानंतर डोनाने सांगितले की, 'माझा चेहरा विकृप झाला तेव्हा मला स्वत:ची लाज वाटत होती. त्यानंतर मी आरशात पाहणेच सोडून दिले होते.'
डॉक्टरांचे मानले आभार
> डोनाने सांगितले की, 'डॉक्टरांनी तिची दुसरी सर्जरी केली ज्याने चेहऱ्यावरील अतिरीक्त चरबी काढण्यात आली. त्यानंतर तिचा चेहरा पहिल्यासारखा होण्याची शक्यता आहे. या आजारातून डोना पुर्णपणे बरी झाल्याने तिच्या कुटूंबियांनी तिचे प्राण वाचल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.