आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींनी 7 महिलांच्या स्वाधीन केले सोशल मीडिया अकाउंट, वयाच्या 13 व्या वर्षी दोन्ही हात गमावलेल्या मालविका म्हणाल्या - हार पत्कारने पर्याय नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान म्हणाले की, भारतात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले, त्यांचा संघर्ष लाखो लोकांसाठी प्रेरणादायी
  • मोदींनी 8 मार्च रोजी आपले सोशल मीडिया अकाउंट महिलांकडे देण्याची घोषणा केली होती

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 7 महिलांकडे आपले सोशल मीडिया अकाउंट स्वाधीन केले आहे. यामध्ये सामाजितक कार्यकर्त्या मालविका अय्यर यांचाही समावेश आहे. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी बॉम्बस्फोट आपले दोन्ही हात गमावले होते. मालविका यांनी पंतप्रधानांच्या ट्विटरवरून ट्विट केले की, हार मानने कोणता पर्याय नाही. ती दिव्यांगांच्या हक्कासीठी लढते. तिने सोशल वर्कमध्ये पीएचडी देखील केली आहे. 

फूड बँक चालवणारी स्नेहा मोहनदास म्हणाल्या - गरीबांच्या भविष्यासाठी काही चांगले करण्याची वेळ


मोदींचे सोशल मीडिया अकाउंट सोपवण्यात आलेल्या सात महिलांमध्ये फूड बँक चालवणाऱ्या स्नेला मोहनदास या देखील आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरून पहिले ट्विट केले. 

काश्मीरची आरिफा स्थानिक महिलांचे सबलीकरण करीत आहे

महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधराराजे सिंधिया यांना देखील शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की, वसुंधराराजे यांनी राजस्थानच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. 

यापूर्वी मोदींनी ट्विट केले की - आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. आम्ही महिला शक्तीच्या भावना आणि क्षमतांना सलाम करतो. मी काही दिवसांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, सोशल मीडियावरून साइन आउट करत आहे. यश संपादन केलेल्या सात महिला माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे त्यांच्या जीवनातील प्रवासाबद्दल सांगतील आणि आपल्याशी बोलतील.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले की, "भारतात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांचा संघर्ष आणि महत्वाकांक्षा लाखो लोकांना प्रेरणा देतो. चला अशा महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करू या आणि त्यांच्याकडून शिकूया."

मोदींनी #SheInspiresUs वर महिलांच्या संघर्ष गाथा शेअर करण्यास सांगितले होते


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनाच्या निमित्ताने आपले सोशल मीडिया अकाउंट्स इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर मोदींनी  #SheInspiresUs वर इतरांसाठी प्रेरणा ठरलेल्या महिलांचे किस्से शेअर करण्याचे आवाहन केले होते.